अकोले काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी शिवाजी नेहे

अकोले- येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदी शिवाजी नेहे यांची निवड केली असल्याची घोषणा महाराष्ट्र राज्याचे माजी महसूलमंत्री तथा काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी अकोल्यात नुकतीच केल्याच्या पार्श्वभूमीवर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
पक्षाचे जेष्ठ नेते तथा अभिनव शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकरराव नवले , सोन्याबापू वाकचौरे , मिनानाथ पांडे यांचे प्रमुख उपस्थितीत हा सत्कार सोहळा संपन्न झाला. अकोले शहर काँग्रेसचे अध्यक्ष , जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस , जिल्हा काँग्रेस सोशल मीडिया अध्यक्ष व सार्वजनिक वितरण व्यवस्था कमिटी आदी पदांवर काम करतांना पक्षाच्या संघटन बांधणीमध्ये तसेच देशाचे नेते खा राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रेत अनेक युवकांसह सहभागी होत पक्षाच्या विविध आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला असल्याने एक अभ्यासू , उत्तम वक्ता , राजकीय व सामाजिक प्रश्नांची उत्तम जाण असलेला युवा तालुका अध्यक्ष मिळाला असल्याची भावना सर्वांनी यावेळी व्यक्त केली. जेष्ठ नेते मधुकर नवले यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत काँगेस पक्षाच्या संघटन पातळीवर अधिक लक्ष केंद्रित करून युवकांना प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्याविषयी मार्गदर्शन केले . यावेळी शिवाजी नेहे यांनी सत्काराला उत्तर देत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले , माजी मंत्री बाळासाहेब थोरात , माजी आ.डॉ सुधीर तांबे , आ. सत्यजित तांबे ,जिल्हा अध्यक्ष राजेंद्र नागवडे या सर्वांचे आभार मानून आपण सर्वाना सोबत घेत एक चांगले काम उभे राहण्यासाठी कटिबद्ध असल्याची भावना व्यक्त केली.
यावेळी रमेश जगताप, मंदाताई नवले, विक्रम नवले, आरिफ तांबोळी, सतीश पाचपुते, प्रा बाळासाहेब शेटे, महिला अध्यक्षा शोभाताई निर्गुडे , रमेश बोडके, नवनाथ वाळुंज, साईनाथ नवले,फैजान तांबोळी,सचिन जगताप, रामदास धुमाळ, मुरलीधर शेणकर , भास्कर मंडलिक, रघुनाथ शेणकर , युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल नाईकवाडी , नगरसेवक प्रदिप नाईकवाडी , रजनीकांत भांगरे यांचेसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते .