आबासाहेब काकडे शैक्षणिक संस्था बंद ठेऊन मराठा आंदोलनाला पाठिंबा देणार -आबासाहेब काकडे

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
भातकुडगाव चौफुल्यावर चालू असलेल्या आमरण उपोषणा वसाखळी उपोषण चालु आहे उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे.दरम्यान आबासाहेब काकडे शैक्षणिक उद्योग समूहाचे अध्यक्ष अॅड शिवाजीराव काकडे यांनी आमरण उपोषणकर्ते भायगावचे सरपंच राजेंद्र आढाव व जोहरापुरचे सरपंच अशोक देवढे साखळी उपोषण कर्ते प्रहारचे तालुकाध्यक्ष रामजी शिदोरे, कामधेनचे चेअरमन बाळासाहेब काळे, मच्छिंद्र आर्ले भायगावचे माजी सरपंच अशोक दुकळे, तुकाराम शिंगटे, भातकुडगावचे माजी सरपंच शंकरराव नारळकर, भगवान आढाव, अदि उपोषण कर्त्याशी चर्चा केली.
यावेळी प्रहारचे रामजी शिदोरे पठिंबा देयाचच असेल तर आपल्या शिक्षण संस्था बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा द्या अशी आग्रही मागणी केल्यानंतर अॅड. शिवाजीराव काकडे यांनी लगेच एक दिवस संस्था बंद ठेऊन आंदोलनास पाठिंबा देणार असल्याचा शब्द आंदोलकांना दिला .
यावेळी भारत महाराज लोढे, अनिल सुपेकर, वाय. डी. कोल्हे, रोहन लांडे, भगवान आढाव,डॉ परवेज सय्यद, डॉ विजय खेडकर, गोरखनाथ शेळके, बबन सौदागर,शरद थोटे, ज्ञानदेव फासाटे, अनिल चिकणे, विष्णु घाडगे, विठ्ठल आढाव, रविंद्र लोढे तुकाराम शिंदे, शुभम काळे, विकास भालेराव, गणेश शिंदे, महादेव ढगे, सुनिल काकडे, संतोष काळे, किशोर देवढे शामसुंदर गणगे आदींनी उपस्थित राहून पाठिंबा दिला.