इतर

डॉ.धनराज हाडुळे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ‘ जगन्नाथ राठी पुरस्कार ‘

 ————————————————-

  अकोले : प्रतिनिधी

   सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ७६ व्या वर्धापन दिनी अगस्ती महाविद्यालयातील तत्त्वज्ञान विभागातील  प्रा. डॉ. धनराज हाडुळे यांना ‘जगन्नाथ राठी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.   विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे महाविद्यालयीन समन्वयक म्हणून उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे.

       पुरस्काराचे वितरण विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी व प्र-कुलगुरु डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्रक, रु. ५००० चा धनादेश असे होते .

जगन्नाथ राठी पुरस्कार प्रत्येक वर्षी विद्यापीठातील . आजीवन अध्ययन व विस्तार विभागाकडून जाहिर केला जातो. 

      सामाजिक , शैक्षणिक , संशोधकीय विभागातील विशेष समन्वयाची कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात येतो . अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे कार्य . विश्वस्त वैभवराव पिचड , कायम विश्वस्त गिरजाजी जाधव , स्वीकृत विश्वस्त एम् . डी . सोनवणे , सुरेश कोते , संपतराव वैद्य , अध्यक्ष सुनील दातीर , सेक्रेटरी सुधाकर देशमुख , कार्यकारिणी पदाधिकारी , प्राचार्य डॉ . भास्कर शेळके तसेच डॉ . सुनील शिंदे , संपत मालुंजकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे . 

      ———————————————

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button