विकास कामे दर्जेदार होण्याकडे कार्यकर्त्यांनी लक्ष द्यावे – आमदार मोनिकाताई राजळे

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव- राज्यात महायुतीचे शासन आल्यानंतर शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात विकास कामांसाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळत आहे,मात्र ही विकास कामे करताना ती दर्जेदार कसे होतील याकडे अधिकारी यांनी लक्ष द्यावे तसेच कार्यकर्त्यानी सतर्क रहावे असे आवाहन आमदार मोनिकाताई राजळे यांनी केले.
अर्थसंकल्प २०२३ अंतर्गत १०० लक्ष रुपये खर्चाच्या शेवगाव ते तळणी देवी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण व १५० लक्ष रुपये खर्चाच्या सालवडगाव ते मूर्शतपूर(धावणवाडी) रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण या विकास कामांचा शुभारंभ आमदार मोनिकाताई राजळे यांच्या हस्ते झाला त्यावेळी त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ह भ प रमेश महाराज डमाळ होते, यावेळी बापूसाहेब पाटेकर, सुनील रासने, भाजपा शहराध्यक्ष रवींद्र सुरवसे, मनसे तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे, नगरसेवक महेश फलके, नितीन दहिवाळकर, कमलेश गांधी, भाजपा सरचिटणीस भीमराज सागडे, तळणीच्या सरपंच शोभाताई झिंज, रामहरी घुले, उपसरपंच दादासाहेब घनवट, बाळासाहेब महाडिक, बाळासाहेब घुले, अनिल भिसे, मुरलीशेठ धुत, लक्ष्मणराव टाकळकर, गंगाभाऊ खेडकर, अंबादास ढाकणे, कैलास सोनवणे सर, संतोष कंगनकर, सुभाष भागवत गुरुजी, सुभाषराव बडदे, महादेव पवार, विष्णू घनवट, एकनाथ खोसे, जावेद शेख, मारुती भागवत, शेतकरी संघटनेचे दत्तात्रय फुंदे, बाळासाहेब फटांगडे, अमोल देवडे, अरुण धस, जगन्नाथ भागवत, संदीपराव जावळे, शिवाजी आधाट, सोमनाथ आधाट, किरण काथवटे, शरद चाबुकस्वार, मीनाताई कळकुंबे, दिलीपराव सुपारे, जलील राजे, सोमनाथ लोखंडे, मुरलीधर धस, बाळासाहेब झिरपे, अर्जुन बांधकाम चे उपअभियंता प्रल्हाद पाठक, ठेकेदार फुलचंद रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार मोनिकाताई राजळे म्हणाल्या- या अगोदर दोन-तीन वर्ष विकास कामांसाठी निधी मिळत नव्हता परंतु राज्यात आपले सरकार आल्याने निधी मिळण्यास सुरुवात झाली आहे सध्या रसत्यांची व जलजीवन मार्फत अनेक गावात पाणी योजनांची कामे सुरु आहेत,विकास कामासाठी निधी मिळतो कामे होतात मात्र ती दर्जेदार पद्धतीने व्हावीत याकडे अधिकारी व कार्यकर्त्यांनी लक्ष द्यावे. कारण काही त्रुटी राहिल्यास लोकप्रतिनिधी व प्रशासनाला टीकेला सामोरे जावे लागते,तसेच एका कामासाठी एकदा निधी मिळाल्यानंतर पुढील १५-२० वर्ष त्या कामासाठी निधी मिळत नाही.विजेच्या प्रश्नासाठी शासनाने प्रत्येक गावात सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्याचे ठरवले आहे.या प्रकल्पासाठी ग्रामपंचायतीने व शेतक-यांनी जागा उपलब्ध करून द्याव्यात असे आवाहन त्यांनी केले