इतर

शेवगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करा – भाजपाचे तहसीलदारानां निवेदन


शहाराम आगळे
शेवगांव तालुका प्रतिनिधी
शेवगांव तालुक्यात पर्जन्यामान सरासरीपेक्षा खुपच कमी असल्यामुळे तालुक्यात सरसकट दुष्काळ जाहीर करण्याची मागणी भारतीय जनता पार्टी शेवगांवच्या वतीने करण्यात आली.

शेवगांव तालुक्याची सुधारित आनेवारी 50 % पेक्षा कमी असुन तालुक्यातील शेवगांव, भातकुडगांव, दहिगांव ने, ढोरजळगांव शे, एरंडगांव, मुंगी, बोधेगांव या सर्वच महसुल मंडळामध्ये आपुरा पाऊस आहे. पाऊस कमी असल्यामुळे खरीपाची पिके वाया गेली असुन रब्बी हंगामाची पिके होऊ शकत नाहीत.

शेतकरी अडचणीत असुन शेतीवर अवलंबुन असणाऱ्या शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली असल्यामुळे तालुक्यात सरसकट दुष्काळ जाहीर करावा ही प्रमुख मागणी भारतीय जनता पक्ष शेवगांव तालुक्याच्या वतीने करण्यात आली. शासनाच्या वतीने तहसिलदार राहुल गुरव यांनी निवेदन स्विकारले.

शेवगांव तालुक्यात दुष्काळ जाहीर करणेसाठी तहसिलदार शेवगांव यांना दिलेल्या निवेदनावर भाजपा तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे, नगरसेवक महेश फलके, गणेश कोरडे, गंगा खेडकर, केशव आंधळे, राणेगांव चे सरपंच शहादेव खेडकर, ठा. निमगांवचे सरपंच संभाजी कातकडे, राक्षीचे सरपंच भक्तराज कातकडे, शिवाजीराव भिसे, भाजपा महिला आघाडी अध्यक्षा आशाताई गरड, भाजपा महिला शहराध्यक्षा उषाताई कंगणकर, संदीप जावळे, प्रा. नितीन मालानी, भगवानराव तेलोरे, कैलास सोनवणे, ज्ञानेश्वर खांबट, सुरेश थोरात, एकनाथ खोसे, हरिभाऊ झुंबड, अमोल माने, विठ्ठल बिडे, बाबासाहेब धस ,आप्पासाहेब पोटभरे, नवनाथ फासाटे आदींच्या सह्या आहे.

तालुक्यात टंचाई सदृष्य परिस्थिती असुन सध्याची परिस्थिती पहाता तालुक्यात लवकरच पिण्याच्या पाण्याची व जनावरांना चारा टंचाई निर्माण होऊ शकते, शासकिय मदत मिळणेसाठी व शेतकरी, शेतमजुर यांना धीर देणेकरिता तालुक्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना पीक विमा व शासकिय मदत मिळावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button