दि.३ व ४ डिसेंबरला पारनेरला राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धा

आ. लंके यांच्यासह पदाधिकाऱ्यांकडून पाहणी
पारनेर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य डायरेक्ट हॉलीबॉल प्रमोशन असोशिएशनच्या मान्यतेने दि.३ व ४ डिसेेंबर रोजी अहमदनगर जिल्हा हॉलीबॉल प्रमोशन असोशिएशनच्या वतीने पारनेर येथे राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी मैदान तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले असून असोशिएशनचे राज्याचे अध्यक्ष आमदार नीलेश लंके, इतर पदाधिकारी तसेच पारनेर नगरपंचायतीच्या नगरसेवकांनी त्याची पाहणी करून सुचना दिल्या.
आ. लंके यांनी असोशिएशनच्या अध्यक्षपदी अलिकडेच निवड झाली होती. त्याच वेळी त्यांनी पारनेर येथे राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्याची घोषणा केली होती. त्याप्रमाणे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आ. लंके यांच्या समवेत संघटनेचे उपाध्यक्ष प्रा. बबनराव झावरे, रामसिंह बायस, जयवंत साळुंके, भाऊसाहेब चक्रनारायण, संपतराव मगर, किरण आहेर, संजय लाकुडझोडे, सुभाष काळे, नितिन गांधी, चंद्रभान ठुबे, युवराज हिलाळ, अप्पासाहेब रेपाळे, मल्हारी रेपाळे, जुनेद शेख, रोहिदास वाबळे, पुंडा बांडे, अनिल इकडे, संजय बढे, सचिन शिंदे, सतीश गांगर्डे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, डॉ. बाळासाहेब कावरे, बाळासाहेब नगरे, भूषण शेलार, सुभाष शिंदे, सचिन औटी, विजय डोळ, गोविंद रेपाळे, विजय औटी, योगेश मते , श्रीकांत चौरे आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. लंके म्हणाले, राज्याच्या संघटनेचे अध्यक्षपद पारनेर तालुक्याला मिळाले असून त्या माध्यमातून हॉलीबॉलच्या विविध स्पर्धा तालुक्यात आयोजित करण्याचा आपला प्रयत्न आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील हॉलीबॉल खेळाडूंना एक चांगले व्यासपीठ निर्माण होणार असून तरूणांनी त्याचा फायदा घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
.