रामदास फुले यांचा विविध सामाजिक संघटनाच्या वतीने सन्मान

अहमदनगर (प्रतिनिधी)-
सकल माळी समाज ट्रस्टच्या माध्यमातून माळी समाज एकवटत आहे.
रामदास फुले यांनी गेल्या 25 वर्षापासून सामाजिक,शैक्षणिक, धार्मिक व आरोग्य आदी विविध क्षेत्रात निस्वार्थपणे कार्य करत आहे.मोठ्या तळमळीने समाज कार्यात फुले अग्रेसर आहेत. रामदास फुले यांची निवड सार्थ ठरेल.असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे ओबीसी मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी केले आहे.
सकल माळी समाज ट्रस्ट,बारा बलुतेदार जिल्हा संघटना, फिनिक्स सोशल फाउंडेशन, स्व. पै.किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सकल माळी समाज ट्रस्टच्या नगर तालुका अध्यक्षपदी नेप्ती येथील सामाजिक कार्यकर्ते रामदास विठोबा फुले यांची निवड झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला.
यावेळी भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, फिनिक्स सोशल फाउंडेशनचे जालिंदर बोरुडे,स्व . पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य नानासाहेब डोंगरे ,अनिल इवळे, चंद्रकांत पुंड,अमोल भांबरकर,लवेश गोंधळे, पत्रकार संजय सावंत, अनिल निकम व विविध सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .
सत्काराला उत्तर देताना रामदास फुले म्हणाले की,समाजाच्या कार्यात तन,मन,धनाने संपर्क व संघटनात्मक कार्यासाठी वेळ देणार आहे.तसेच समाजाला संघटित करण्यासाठी प्रयत्न करणार असून समाजाच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सकल माळी समाज ट्रस्ट च्या माध्यमातून सामाजिक कार्य केले जाईल.