इतर

आजचे पंचांग व राशिभविष्य दि 10/11/2023

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- कार्तिक १९ शके १९४५
दिनांक :- १०/११/२०२३,
वार :- भृगवासरे(शुक्रवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:३४,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०५:५२,
शक :- १९४५
संवत्सर :- शोभन
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- शरदऋतु
मास :- अश्विन
पक्ष :- कृष्षपक्ष
तिथी :- व्दादशी समाप्ति १२:३६,
नक्षत्र :- हस्त समाप्ति २४:०८,
योग :- वष्कंभ समाप्ति १७:०५,
करण :- गरज समाप्ति २५:२१,
चंद्र राशि :- कन्या,
रविराशि – नक्षत्र :- तुला – विशाखा,
गुरुराशि :- मेष,
शुक्रराशि :- कन्या,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- दु. ०१प. चांगला दिवस,

✿राहूकाळ:- सकाळी १०:४८ ते १२:१३ पर्यंत,

लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०७:५९ ते ०९:२३ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०९:२३ ते १०:४८ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी १२:१३ ते ०१:३८ पर्यंत,

❀ दिन विशेष:
गुरूद्वादशी, प्रदोष, धनत्रयोदशी, यमदीपदान, त्रयोदशी श्राद्ध,
————–

:

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- कार्तिक १९ शके १९४५
दिनांक = १०/११/२०२३
वार = भृगवासरे(शुक्रवार)

मेष
व्यावसायिक क्षेत्रात उत्तम काळ. मनात चांगले विचार घोळत राहतील. दिनक्रम व्यस्त राहू शकेल. कोणत्याही वादापासून दूर राहावे. करिअर मध्ये प्रगती करता येईल.

वृषभ
प्रवासाचे योग येतील. आहाराची पथ्ये पाळा. नवीन ओळख लाभदायक ठरेल. एखाद्या महत्त्वाच्या विषयावर घरात चर्चा होईल. जोडीदाराची प्रगती होईल.

मिथुन
नवीन व्यवसायासाठी सुसंधी सापडेल. नोकरदार वर्गाने कामाकडे विशेष लक्ष द्यावे. पराक्रमात वृद्धी होऊ शकेल. हित शत्रूंपासून सावध राहावे. आरोग्यात सुधारणा होईल.

कर्क
व्यावसायिक क्षेत्रात चलती दिसून येईल. मध्यम फलदायी दिवस. भविष्यातील योजनांवर काम करणे आवश्यक. मित्रांसोबत काळ व्यतीत कराल. फाजील आत्मविश्वास टाळावा.

सिंह
नवीन कामासाठी प्रवृत्त व्हाल. दुसर्‍यांच्या मदतीला धावून जाल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. हातातील कलेला योग्य दाद मिळेल. नोकरदारांना दिवस चांगला जाईल.

कन्या
व्यसनांना वेळीच आवर घाला. पैशाची उधळपट्टी होत नाही ना याची काळजी घ्या. उत्साहवर्धक दिवस असेल. बोलण्यातील माधुर्य जपाल. गायक मंडळींना चांगली प्रतिष्ठा लाभेल.

तूळ
सर्वांना गोडीने आपलेसे कराल. मित्रांशी पुन्हा नव्याने संबंध जुळतील. जोडीदाराशी नाते अधिक दृढ होईल. विवाहाची बोलणी पुढे सरकतील. आर्थिक पातळीवर दिवस चांगला जाईल.

वृश्चिक
जुनी उधारी वसूल होईल. दिवस चांगला जाईल. जवळचा प्रवास घडेल. व्यवसाय वाढीचे प्रयत्न यशस्वी होऊ लागतील. एखाद्या कामाला खीळ बसू शकते.

धनू
सामाजिक क्षेत्रात कौतुक केले जाईल. मनाप्रमाणे खरेदी करता येईल. नातेवाईक तुमच्यावर नाराज होऊ शकतात. अनावश्यक खर्च वाढू शकतो. कौटुंबिक परिस्थिती संयमाने हाताळावी.

मकर
आवश्यक असेल तरच आपले मत मांडावे. नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतील. कामात जोडीदाराची साथ मिळेल. प्रवासात घाई करून चालणार नाही. आपल्या साठी काही वेळ राखून ठेवावा.

कुंभ
मानसिक संतुलन राखावे. नवीन कामात तज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यावा. खर्चाचा पूर्ण अंदाज बांधावा. हातातील प्रकल्प पूर्णत्वास जाईल. चिकाटी सोडू नका.

मीन
घरात धार्मिक कार्य घडेल. प्रगतीचे नवे दार खुले होईल. भावंडांसोबत नातेसंबंध सुधारतील. व्यवसायात प्रतिष्ठा वाढीस लागेल. नव्या योजनेत गुंतवणूक कराल.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button