इतर
मेहनतीच्या जोरावर बहिण-भावाची वैद्यकीय शिक्षणासाठी निवड

संगमनेर तालुक्यातील पठार भागातील सारोळे पठार येथील समाजिक कार्यकर्ते श्री कुंडलिक बाजीराव साळुंके यांची कन्या कु. कोमल हिची आदित्य डेंटल कॉलेज, बीड येथे BDS म्हणजे बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी साठी निवड झाली आहे. तसेच मुलगा चि.रोहित ह्याची मातोश्री असराबाई दराडे आयुर्वेदिक कॉलेज, येवला येथे BAMS साठी निवड झाली आहे. एकाच कुटुंबातील दोघांची वैद्यकीय शिक्षणासाठी निवड झाल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. शालेय तसेच महाविद्यालयीन जीवनात दोघांचीही शैक्षणिक कामगिरी नेहमी उल्लेखनीय राहिली आहे.