रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पक्षाचीअकोले तालुका कार्यकारणी जाहीर

अकोले प्रतिनिधी
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे ,महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्षा श्रीमती सुनिताताई चव्हाण, महाराष्ट्र कार्याध्यक्ष श्री. बाळासाहेब पवार यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पक्षाच्या अकोले तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक काल दि. 13/10/23 रोजी राजूर येथे आयोजित करण्यात आली होती
यावेळी बैठकीचे अध्यक्ष व आर पी आय उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत दारोळे अकोले तालुका अध्यक्ष विजय पवार यांचे मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या बैठकीत आरपीआय( ए)च्या अकोले तालुक्यात घर तेथे सभासद व गाव तेथे शाखा व गोरंगरिब जनतेच्या सामाजिक आर्थिक प्रश्नावर चर्चा झाली समाजातील मुलभुत प्रश्नाबरोबर इतर सामाजिक मुद्द्यां-वरून पक्षवाढीसाठी सर्वानी एकत्रित संघटीत होवून काम करण्याच्या सुचना कार्यकर्त्यांना दिल्या.

यावेळी शेकडो नविन कार्यकर्त्यांनी आरपीआय पक्ष प्रवेश केला त्यांचा यावेळी
शशिकांत दारोळे यांच्या हस्ते नवीन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला,व श्री शशिकांत दारोळे व तालुका अध्यक्ष विजय पवार यांनी अकोले तालुका आरपीआय ची नविन कार्यकारीणी जाहिर केली ती पुढील प्रमाणे :-
दीपक आढाव ( अकोले शहर अध्यक्ष)
शंकर वायळ ( अपंग सेल अकोले तालुकाध्यक्ष)
- सचिन भांडकोळी (राजुर शहर अध्यक्ष)
राजेंद्र सोनवणे (घाटघर विभाग प्रमुख) - अभिजित काळे ( राजुर शहर उपाध्यक्ष
भीमराव देठे -(शेलविहीर- आढळा विभाग)
:- पंढरीनाथ भारमल (पाचनई- मुळा विभाग)
सुधीर पवार- अकोले तालुका सचिव
यावेळी सचिन ढोले , संदीपभाऊ खरात गणेश मुतडक , संतोष थोरात, विट्ठल कोरडे, दत्तू कोरडे, दामु पटेकर, ‘हनुमंता भोईर, रवि येडे, राहुल पवार सुरेश साबळे, रवि वैराट, प्रल्हाद शिंदे खंडू भवारी लता साबळे मनीषा पवार व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते,