अकोले शहराचा पारूप आराखडा हरकतीची मुदत वाढवा- ग्राहक पंचायत

अकोले (प्रतिनिधी) अकोले नगरपंचायत शहर विकास आरखड्याचा प्रारूप नकाशा नगरपंचायतीने प्रसिद्ध केला व नागरीकांच्या काही हरकती असतील तर त्याची मुदत 2 डिसेंबर अशी आहे.
तसेच सदर प्रारूप नकाशा मधिल माहिती ही इंग्रजी मध्ये असल्यामुळे सर्व सामान्य नागरिकांची नगर पंचायतमध्ये धांदळ उडाली आहे . प्रारूप नकाशा मधील सर्वे नंबर मधील आरक्षित रस्ते व आरक्षित प्लॉट इत्यादी माहिती ज्या सर्व्हे नंबर मधून गेले आहे त्या सर्व्हे नंबर ची सविस्तर माहिती किंवा बांधीत क्षेत्रफळ याची माहिती इंग्रजी मध्ये असल्याने धांदल उडाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेचे कामकाज मराठीतच असावे असे विधायक दिनांक २४/०३/२०२२ रोजी विधानसभेत विधायक मंजूर झाले असतांनाही नुकताच प्रसिद्ध झालेला नगरपंचायत अकोले शहर विकास आराखड्याचा प्रारूप नकाशा हा इंग्रजीत प्रसिद्ध केलेला असून तो मराठी भाषेमध्ये प्रसिद्ध व्हावा असे निवेदन ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा अकोले यांनी मुख्याधिकारी नगरपंचायत अकोले व सहाय्यक संचालक नगररचना अहमदनगर यांना दिले आहे.तसेच निवेदनात म्हटले की प्रारूप नकाशा मध्ये दाखविलेले रस्ते ज्या सर्व्हे नंबर मधून गेलेले आहे त्या सर्व्हे नंबर ची सविस्तर माहिती किंवा बांधीत क्षेत्रफळ या बाबतची सविस्तर माहिती आरक्षित प्लॉट मध्ये आवश्यक सार्वजनिक सोयी सुविधा काय असतील याचा बोध होत नाही. रस्ते ज्या सर्व्हे नंबर मधून गेले आहे त्याच्या खुणा खानाचा उलगडा होत नाही. नागरिकांना वाटते की आपले घर, गोठे, शेत, विहिर, दुकाने इत्यादी मधून गेले तर नाही ना?
प्रारूप नकाशा मधील लेजंड (सूचना) इंग्रजी मध्ये असल्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना समजत नाही. प्रारूप नकाशा मराठीतून सूचना असाव्यात.
हरकत घेण्याची मुदत वाढवण्यात यावी, शहरामधील प्रत्येक वॉर्डामध्ये दवंडी (ध्वनी प्रक्षिपित) करावी असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर ग्राहक पंचायत महाराष्ट्र जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक, जिल्हा सह सचिव रमेश राक्षे, तालुका अध्यक्ष दत्ता शेनकर, वसंत बाळसराफ, राम रुद्रे, नरेंद्र देशमुख, दत्ता ताजने, सुदाम मंडलिक, ॲड दिपक शेटे, भाऊसाहेब वाकचौरे आदींची नावे आहेत.