पाथर्डी ,शेवगाव मध्ये डॉ.सुजय विखे पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त ब्लॅंकेट वाटप

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
अहमदनगर दक्षिणचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त स्वाभिमानी मराठा महासंघाचे शेवगाव तालुका अध्यक्ष अनिल सुपेकर यांच्या वतीने अनाथ मुलांना व गरजवंत रस्त्यावरील बेवारस लोकांना ब्लॅंकेट व मिठाईचे वाटप करून वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.
शेवगाव तालुक्यातील इतर ठिकाणी ही विखे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. नेहमीच समाजकारणात अग्रेसर असणाऱ्या अनिल सुपेकर यांनी स्वखर्चातून आपल्या मित्र परिवारांना सोबत घेऊन शेवगाव, पाथर्डी, तिसगाव, श्री क्षेत्र मढी, श्री क्षेत्र मोहटादेवी, श्री क्षेत्र सावरगाव परिसरातील अनाथ लोकांना थंडीपासून संरक्षण मिळावे. यासाठी या अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये गरजवंतापर्यंत जाऊन त्यांना एक मायेची उब देण्याचा प्रयत्न केला आहे. या कार्याचे शेवगाव तालुक्यातून कौतुक होत आहे.
छत्रपती शिवरायांच्या जयंती उत्सवानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, अपंगांना सायकल वाटप, भिकाऱ्यांना स्वाभिमानाने जगता यावे यासाठी मागील वर्षी वजन काटेचे वाटप करून नवीन आदर्श घालून देण्याचा प्रयत्न केला होता. यावर्षी वाढदिवसानिमित्त ब्लॅंकेट वाटप करून सामाजिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आपण हे काम करत असल्याने आपणाला मनस्वी आनंद वाटतो.
अनिल सुपेकर
स्वाभिमानी मराठा महासंघ शेवगाव तालुका अध्यक्ष