खिरविरे परिसरात वादळी पाऊस ,घरांचे छप्पर उडाले, भात पिकांचे मोठे नुकसान

झाड अंगावर पडून शेतकरी गंभीर जखमी.
अकोले/प्रतिनिधी-
अकोले तालुक्यातील उत्तर भागातील खिरविरे,पाडोशी,वाखारी,चंदगीरवाडी, एकदरे,पिंपळदरावाडी,रामवाडी, जायनावाडी,इदेवाडी,बिताका,तिरडे,पाचपट्टा यांसह परिसरात वादळी वाऱ्यासह,विजेच्या कडकडाटासह पावसाने जोरदार पाऊस झाला
काही शेतकऱ्यांच्या घराचे छप्पर उडाले तसेच भात पिकांचे प्रचंड नुकसान झाले तर शेतकऱ्याच्या अंगावर झाड पडून गंभीर जखमी झाले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.वादळी वारे, विजांचा कडकडाट व पावसाने चांगलीच धांदल झाली. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
चंदगीरवाडी परिसरात दत्तु नथू भांगरे यांच्या अंगावर झाड पडल्याने ते गंभीर जखमी झाले आहे.त्यांना पुढील उपचारासाठी एसएमबीटी हॉस्पीटल घोटी येथे नेण्यात आले आहे.
तसेच परिसरातील अशोक त्रिंबक शिंदे,इंदुबाई सुधाकर चौरे, बाळु काळु भांगरे,लहानु गोविंद भांगरे, साळुबाई भांगरे यांच्या राहत्या घरांचे छप्पर उडून संसार उपयोगि वस्तू, कपडे,धान्य यांचे प्रचंड नुकसान झाले

शेतात पाणी साचल्याने भातपिकांचे देखिल मोठे नुकसान झाले आहे.
ग्रामीण भागात शेती कोडरवाहू आहे.भात हेच एकमेव पिक उदरनिर्वाहाचे साधन आहे. लेकराबाळांचे शिक्षण,अन्न, वस्त्र,निवारा,अरोग्य या जिवनावश्यक गरजांची पुर्तता, छोटेमोठे धार्मिक कार्यक्रम, नैसर्गिक, मानवनिर्मित संकटे यांवर होणारा खर्च त्यामुळे आधिच मेटाकुटीला आलेला शेतकरी चांगलाच आर्थिक संकटात सापडला आहे.तोंडापासी आलेला हक्काचा घास नैसर्गिक संकटामुळे ओढून नेला जात आहे.लोकप्रतिनिधींनी याकडे गांभिर्याने लक्ष देण्याची वेळ आहे.नुकसानीची भरपाई मिळावी,यासाठी प्रशासनाने तातडीने पंचनामे करावेत. अशी शेतकरी वर्गाकडून मागणी होत आहे.