तहसीलदारांच्या निवासस्थाना जवळून वाळूच्या ढंपर ची चोरी

दत्तात्रय शिंदे –
तहसीलदार निवासा शेजारील सार्वजनिक बांधकाम
कार्यालयाच्या समोरच्या आवारात लावलेले वाळूने भरलेले 2 डंपर चोरट्यांनी पळविल्याची घटना घडली आहे.
याबाबत मुकिंदपूरचे तलाठी अण्णा भीमराव दिघे (वय 49 ) यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात
म्हटले आहे की, दि. 16 ऑक्टोबर 2023 रोजी अहमदनगर गौण खनिज पथकाने कैलास मच्छिंद्र पवार (रा. नेवासा खुर्द, ता. नेवासा), सागर केशव लष्करे (रा. नेवासा खु. ता. नेवासा) यांच्या मालकीचे दोन
वाळूने भरलेले डंपर पकडून ते तहसीलदार बंगल्या शेजारी सार्वजनिक बांधकाम कार्यालयाच्या समोरच्या
प्रांगणात उभे केले होते.
मात्र दि. 19 रोजी सदर दोन्ही वाळूने भरलेले डंपर त्याठिकाणी नव्हते. कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी करून नेले आहेत. त्यानुसार नेवासा पोलीस
स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे. एकूण 4 लाख 2 हजार 400 रुपये किंमतीचे डंपर अज्ञात चोरट्याने चोरून
नेले आहेत.
याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 379 नुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.