जलनायक स्व. मधुकरराव पिचड यांच्या अस्थी कलशा चे पिंपळगाव खांड जलाशयात विसर्जन!

कोतूळ प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री लोकनेते व अकोले तालुक्याचे जलनायक दिवंगत मधुकरराव काशिनाथ पिचड यांच्या अस्थी कलशाचे विसर्जन पिंपळगाव खांड धरणाच्या जलाशयात विधिवत पुजन करून धरणात अस्थी कलशाचे विसर्जन करण्यात आले

साहेब तुम्ही परत या,अमर रहे अमर रहे पिचड साहेब अमर रहे,. या घोषणा देत व टाळ पखवाजा च्या निनादात त्यांचे स्मरण करत , स्व पिचड यांच्या रुपाने तालुक्यातील विकासाला मिळालेली अनमोल साथ नेहमी स्मरणात राहील. अकोले तालुका पोरका झाला आहे असा जलनेता परत होणार नाही साहेब तुम्ही परत जन्माला या, अशा आठवणींची श्रद्धांजली वाहत त्यांच्या अथक परिश्रमातून उभ्या राहिलेल्या पिंपळगाव खांड धरणाच्या जलाशयात त्यांच्या अस्थी कलशाचे विसर्जन करण्यात आले यावेळी

कैलासराव वाकचौरे, शिवाजीराजे धुमाळ, गिरजाजी जाधव भाजपा तालुका अध्यक्ष सीताराम भांगरे ,
कोतुळ चे उपसरपंच राजू पाटील देशमुख ,राजेंद्र डावरे,अमृतसागर चे व्हाईस चेअरमन रावसाहेब वाकचौरे अकोले चे नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सिताराम पाटील देशमुख ,राजेंद्र देशमुख,अकोले तालुका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुनील दातीर,

शिवसेनचे जेष्ठ नेते प्रभाकर फापाळे, युवा नेते सचिन गिते, भाजपा चे गणेश पोखरकर ,बाळासाहेब देशमुख, महेश नवले, बांधकाम व्यावसायिक संजय जाधव , बाजार समितीचे उप सभापती रोहिदास भोर, भाऊसाहेब देशमुख ,बाळासाहेब सावंत, सुधाकरराव देशमुख ,अर्जुन गावडे , दगडू हासे ,भाऊसाहेब शेटे , संजय शेटे अमोल कोते ,श्री तळेकर ,सोमदास पवार, गंगाधर शेटे अंजनाबाई जाधव, सयाजीराव देशमुख , रावजी धराडे ,भीमराज देशमुख अजय चौधरी आदी सह अनेक नागरिक उपस्थित होते
