सहकार

अगस्ती कारखान्याची पहिली उचल 2700 रुपये -,सिताराम पाटील गायकर

अकोले ;- अकोले तालुक्यातील अगस्ती सहकारी साखर कारखान्याचा सन 2023 – 24 चा गळीत हंगाम सुरू झाला असून या गळीत हंगामासाठी इतर कारखान्यांच्या बरोबरीने अगस्ती सहकारी साखर कारखान्याने पहिली उचल 2700 रुपये देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती अगस्तीचे चेअरमन सिताराम पाटील गायकर व व्हॉईस चेअरमन सुनिताताई भांगरे यांनी दिली.पुढील आठवड्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा केली जाणार असल्याचे अगस्तीच्या संचालक मंडळाने सांगितले.

अगस्ती साखर कारखाना कार्यस्थळावर संचालक मंडळाची बैठक होऊन त्यामध्ये प्रथम उचल देण्यासाठी सविस्तर चर्चा होऊन यावर्षी गळीतास येणाऱ्या ऊसास पहिली ऊचल रुपये २७०० प्रतिटन देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. अगस्ती कारखान्याची आर्थिक परिस्थिती हलाखीची नसतानाही संचालक मंडळाने रुपये 2700 प्रतिटन भाव देण्याचे ठरविलेले असल्याने ऊस पुरवठादार शेतकऱ्यांनी आंदोलन करु नये व अगस्ती कारखान्यास सहकार्य करावे.तसेच अकोले तालुक्यातील ऊस पिकविणारे सर्व शेतकऱ्यांनी ऊस इतर कारखान्यांना न देता अगस्ति कारखान्याच्याच गळीतास द्यावा असे आवाहन चेअरमन सिताराम पाटील गायकर आणि व्हॉईस चेअरमन सुनिताताई भांगरे यांनी केले आहे.या बैठकीसाठी कारखान्याचे संचालक मिनानाथ पांडे,परबतराव नाईकवाडी,रामनाथ बापू वाकचौरे,अशोकराव देशमुख,अशोकराव आरोटे, मच्छिंद्र धुमाळ,पाटीलबुवा सावंत,विकासराव शेटे, विक्रम नवले,मनोज देशमुख,प्रदिप हासे व कार्यकारी संचालक सुधिर कापडणीस उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button