इतर

भातकुडगांव येथील सुश्मिता शिंदे यांची आय डी बी आय मध्ये निवड, शेवगावत सत्कार


शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
सुष्मिता मच्छिंद्र शिंदे हिची नुकतीच आय डी बी आय बँक मध्ये असिस्टंट मॅनेजर कधी निवड झाल्याबद्दल विविध संघटनाच्या वतीने सत्कार करून गौरव करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य चर्मकार विकास संघ शेवगाव, शब्दगंध साहित्यिक परिषद शाखा शेवगाव, रविदासीया चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री व अहमदनगर जिल्हा महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ वतीने सुश्मिता मच्छिंद्र शिंदे हिची आय डी बी आय बँक मधे असिस्टंट मॅनेजर पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी शेवगाव शब्दगंध साहित्यिक परिषदचे अध्यक्ष हरिभाऊ नजन, संतोष कगंणकर तालुकाध्यक्ष चर्मकार विकास संघ, वैभव रोडी जिल्हाध्यक्ष अहमदनगर जिल्हा महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ, सलिम शेख, भाऊसाहेब पाचरणे, दिनेश तेलुरे, रावसाहेब सातपुते, उध्दव गुजर, संतोष कानडे, संदिप सोनवणे, मच्छिंद्र शिंदे, दमयंती शिंदे, सुरेखा कानडे, कमल कानडे, सिध्दांत शिंदे,स्नेहल कानडे, सोहम कानडे आदिनाथ पालवे, रमेश पवार आदि उपस्थित होते.

शेवगाव तालुक्यातील भातकुडगांव येथील रहिवासी असलेले मच्छिंद्र विठ्ठल शिंदे व दमयंती शिंदे यांची कन्या सुश्मिता हिने. बीएससी फिजिक्स या विषयात महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर सुश्मिताने बॅकिंग क्षेत्रात करिअर करण्यासाठी अभ्यास सुरू केला. बँकींग क्षेत्रातील अनेक परिक्षा देत तीने यश मिळवले आहे. चर्मकार समाजातील पहिली महिला बँक अधिकारी होण्याचा मान मिळवला आहे. त्याबद्दल तिचे सर्व स्तरावर अभिनंदन करुन कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button