पद्मशाली सखी संघमच्या आकाश कंदील बनवण्याच्या प्रशिक्षणाला उस्फूर्त प्रतिसाद….

हजारों हात सरसावले, ‘आकाश कंदील’
तयार करण्याच्या प्रशिक्षणासाठी…..
सोलापूर – अनेकांना दिवाळीत आकाश कंदील घरी लावल्याशिवाय दिवाळी साजरा केल्यासारखे वाटत नाही. म्हणून, श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन संचलित पद्मशाली सखी संघमच्या वतीने सर्वांनाच स्वत: बनवता यावेत या उद्देशाने आकाश कंदील बनवण्याचे मोफत (नि:शुल्क) प्रशिक्षण देण्यात आले होते. याला अनेकांनी उपस्थिती राहून उस्फूर्त प्रतिसाद दिला.
प्रथमतः बुध्दीदेवता श्री गणेशाचे पूजा व आरती करुन प्रशिक्षणाला सुरवात केले. शनिवारी सायंकाळी पूर्व भागातील दत्तनगर चौकात असलेल्या श्री दाजी गणपती येथे ‘आल इज वेल’चे संस्थापक सुरेश येमूल यांनी आकाश कंदील बनवण्याचे प्रशिक्षण दिले. प्रशिक्षण देताना सोप्या पद्धतीने ४ – ५ प्रकारच्या शिकवले. यामुळे अनेकांना आवडून स्वत: तयार करण्यात हजारों हात गुंतले. याचे साहित्य पद्मशाली सखी संघमच्या वतीने देण्यात आले होते. तयार केल्यानंतर सर्वांचे चेहरे आनंदाने ओसंडून वाहत होता. ज्यांनी आकाश कंदील तयार केले त्यांना घरी लावण्यासाठी देण्यात आले.
पद्मशाली सखी संघमच्या अध्यक्षा मेघा इट्टम यांनी प्रास्ताविक करुन प्रशिक्षक सुरेश येमूल यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले. समन्वयिका कला चन्नापट्टण यांनी उपस्थितांचे स्वागत करत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. वनिता सुरम यांनी आभार मानल्या. यावेळी आरती आडम, पद्मा मेडपल्ली, पल्लवी संगा, योग शिक्षिका शांता संगा, धनश्री इट्टम यांच्यासह आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————