इतर

हिंदू धर्माची टिंगल करण्याचे षडयंत्र राबवले जात आहे.-उद्धव महाराज मंडलिक

अकोले प्रतिनिधी

हिंदू धर्म सहिष्ण असल्याने हिंदू धर्माची टिंगल करण्याचे षडयंत्र राबवले जात आहे. धर्मनिरपेक्षता ही बेगडी असून ती फक्त हिंदू धर्मा विरोधात राबविली जाते असे स्पष्ट मत जगद्गुरू तुकाराम महाराज संस्थान नेवासा चे मठाधीपती ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक यांनी व्यक्त केले.
अमृतवाहिनी प्रवरामातेच्या तीरावर वसलेल्या ब्रह्मलीन प.पू. सुभाष पुरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने श्री क्षेत्र कळस बु येथे अखंड हरिनाम सप्ताह मध्ये काल्याचे कीर्तनात
ये दशे चरित्र केले नारायणे । रांगता गोधने राखिताहे ॥१॥
या गाथ्यातील बाळ क्रीडा प्रकरणातील अभंगावर निरूपण करताना बोलत होते.
यावेळी अगस्ती देवस्थान ट्रस्ट चे विश्वस्त विष्णू महाराज वाकचौरे, गणेश महाराज वाकचौरे, कळसेश्वर देवस्थान ट्रस्ट चे विश्वस्त देवराम महाराज वाकचौरे, आचार्य अरुण महाराज फरगडे, सरपंच राजेंद्र गवांदे, भाजपा सोशल मीडिया सेल चे जिल्हा संयोजक भाऊसाहेब वाकचौरे, उपसरपंच केतन वाकचौरे आदी उपस्थित होते.
मंडलिक महाराज यांनी हिंदू धर्मातील देव देवता, साधू संत यांच्या बद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्या अपप्रवृत्ती चा व ज्यांच्या समोर केला असे वक्तव्य केले ते महाराष्ट्रातील स्वतःला जाणते नेते म्हणून घेणाऱ्या च्या मुक संमतीचा निषेध केला हिंदू समाजाने केला पाहिजे. धर्म आणी संस्कृतीला बाधा आणण्याची खोटी धर्मनिरपेक्षता बेगडी आहे. यात फक्त हिंदू धर्मावर लक्ष केल जात.
हिंदू धर्म कोणत्याही जातीचा द्वेष करत नाही. भारत भूमी नेहमी विश्व बंधुत्वाचा संदेश देत असते. हिंदू धर्मातून निर्माण झालेले धर्म पंथ यांचा सुद्धा राग केला नाही. जाती पाती मध्ये भांडणे लावून फुट पाडण्याचे काम केले जात आहे. देश सुरक्षित राहण्यासाठी संस्कृती टिकली पाहिजे यासाठी हिंदू समाज संघटित झाला पाहिजे.
आपल्या देशाच्या चोहो बाजूनी आपप्रवृत्ती असून अमेरिका, चिन, पाकिस्थान आपले देशाला हानी पोहचविण्याचे काम करीत आहे. गीता , गाथा यांचे ज्ञान आपल्या पुढील पिढीला मिळाले पाहिजे. तरुणांनी कोणाचे दास न होता राजकारणा पासून दूर राहिले पाहिजे, तरुणी नी आपला जोडीदार निवडताना त्यांचे संस्कार पाहिले पाहिजे. झगामगत्या दुनिया च्या नादी लागू नये. आभासी जगाच्या मागे पळू नका असा मंडलिक महाराज यांनी सल्ला दिला.
कोट:- उद्धव महाराज मंडलिक यांनी प्रभू श्रीराम व स्वामी समर्थ यांच्या विषयी बोलणाऱ्या मूर्ख महारावं व त्यांच्या वक्तव्याला मुक संमती देणाऱ्या जाणत्या नेत्याचा निषेध केला. याला सर्व भाविकांनी दोन्ही हात वर करून संमती दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button