इतर

आजचे पंचांग व राशिभविष्य दि.१२/०७/२०२३

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- आषाढ २१ शके १९४५
दिनांक :- १२/०७/२०२३,
वार :- सौम्यवासरे(बुधवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:०१,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०७:०८,
शक :- १९४५
संवत्सर :- शोभन
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- ग्रीष्मऋतु
मास :- आषाढ
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- दशमी समाप्ति १८:००,
नक्षत्र :- भरणी समाप्ति १९:४४,
योग :- धृति समाप्ति ०९:४०,
करण :- बव समाप्ति ३०:०९,
चंद्र राशि :- मेष,
रविराशि – नक्षत्र :- मिथुन – पुनर्वसु,
गुरुराशि :- मेष,
शुक्रराशि :- सिंह,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- भद्रा वर्ज्य दिवस,

✿राहूकाळ:- दुपारी १२:३५ ते ०२:१३ पर्यंत,

लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०६:०१ ते ०७:४० पर्यंत,
लाभ मुहूर्त — सकाळी ०७:४० ते ०९:१८ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी १०:५६ ते १२:३५ पर्यंत,
लाभ मुहूर्त — संध्या. ०५:३० ते ०७:०८ पर्यंत,

❀ दिन विशेष:
घबाड १८:०० प., भद्रा १८:०० प.,
————–

🌏 दैनिक राशीभविष्य 🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- आषाढ २१ शके १९४५
दिनांक = १२/०७/२०२३
वार = सौम्यवासरे(बुधवार)

मेष
आजच्या दिवसाची सुरवात आपण स्फूर्तीने व उत्साहाने कराल. मित्र व सगे सोयरे यांच्या येण्या जाण्याने घरातील वातावरण आनंदाचे राहील.

वृषभ
आज कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका. आज गैरसमज होण्याची शक्यता आहे. प्रकृती खराब असल्यामुळे मन उदास बनेल.

मिथुन
आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील. समाजात मान व प्रतिष्ठा वाढेल. मित्रां कडून फायदाही होईल व त्यांच्यासाठी पैसेही खर्च होतील. 

कर्क
आज गृह सजावटीवर आपण विशेष लक्ष द्याल. घरगुती वापराचे नवीन साहित्य खरेदी कराल. व्यापारी व नोकरदार लाभाची किंवा बढतीची अपेक्षा करू शकतात. 

सिंह
आज स्वभावात उग्रता व संताप असल्यामुळे काम करण्यात आपले मन लागणार नाही. वादविवादात आपल्या अहंकारामुळे कोणाची नाराजी ओढवून घ्याल.

कन्या
आज आपण एखादे काम हाती घेणे हिताचे ठरणार नाही. बाहेरचे खाण्यामुळे प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. क्रोधावर नियंत्रण ठेवण्यासाठी मौन हेच शस्त्र उपयुक्त ठरेल. 

तूळ
आजचा दिवस प्रणय, प्रेमालाप, मनोरंजन व मौज – मस्ती करण्याचा आहे. सार्वजनिक जीवनात महत्व मिळेल. यश व कीर्ती वाढेल. 

वृश्चिक
आज आपण निश्चिंतपणा व सुखशांतीमध्ये घरात वेळ घालवाल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य कार्य करण्यासाठी उत्साह देईल. 

धनु
आज आपण संततीचा अभ्यास व स्वास्थ्य ह्यामुळे चिंतीत व्हाल. पोटाच्या तक्रारी सतावतील. कामातील अपयशाने आपण निराश व्हाल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. 

मकर
आजचा दिवस प्रतिकूलतेचा असल्याने मन खिन्न होईल. शारीरिक स्फूर्ती, तरतरी ह्यांचा अभाव राहील. सार्वजनिक जीवनात मानहानी होण्याचा संभव आहे.

कुंभ
आज आपण तना – मनाने प्रसन्न व्हाल. मनात असलेले चिंतेचे मळभ दूर होऊन उत्साह वाढेल. भाऊबंदांसह नवीन योजना ठरवाल. त्यांच्यासह आनंदात वेळ जाईल. 

मीन
आजचा दिवस आर्थिक नियोजन करण्यासाठी अनुकूल आहे. नियोजित कामे पूर्ण होतील. प्राप्तीत वाढ होईल. कुटुंबात सुख शांतीचे वातावरण असेल. 

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button