समशेरपूर येथे तालुकास्तरीय घरजमीन हक्क परिषद चे आयोजन

अकोले प्रतिनिधी
अखिल भारतीय किसान सभा,अहमदनगर आयोजित भव्य तालुकास्तरीय घरजमीन हक्क परिषद शुक्रवार दि २२ डिसेंबर २०२३ सकाळी ११:०० वाजता समशेरपूर ता अकोले येथे आयोजित केली आहे
घराच्या तळाच्या जमिनी घरात राहणारांच्या नावे करा !घराभोवतीच्या आवाराची जमीन ताबेदाराच्या नावे करा !गावठाण, गायरान, सरकारी व ग्रामपंचायत जमीनताबेदाराच्या नावे करा ! अशा मागण्या यात केल्या आहे
डॉ. भाऊराव उघडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिषदेसाठी डॉ. अजित नवले मार्गदर्शन करणार आहे
यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन कॉ. सदाशिव साबळे ,कॉ. एकनाथ मेंगाळ कॉ. नामदेव भांगरे ,कॉ. राजाराम गंभिरे कॉ. गोरक्ष आगिवले ,कॉ. सुमन विरनक कॉ. ज्ञानेश्वर काकड कॉ. दामू गीन्हे कॉ. तुकाराम मेंगाळ ,कॉ. तुळशीराम कातोरे कॉ. भाऊसाहेब शेलार ,कॉ. देवराम उघडे. यांनीं केले आहे