१३ मार्च रोजी शिवप्रेमी संघटनांकडून शेवगांव बंद!

शेवगाव प्रतिनिधी
हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अवमानकारक मेसेज प्रसारित करणाऱ्या समाजकंटकांच्या निषेधार्ह उद्या १३/३/२०२३ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव शहर बंद ठेवण्याचे आवाहन शहर व तालुक्यातील शिवभक्तांनी केले आहे
, शहरातील सर्व व्यापारी बांधवानी सहकार्य करून सदरील घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी उद्या सकाळी ठीक १०.०० वाजता शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी सर्व शिवभक्तांनी एकत्रित यावे व डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथून निषेध मोर्चा क्रांतीचौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं पर्यंत राहील.तरी प्रशासनाकडून याबाबत योग्य ती दखल घेण्यात येऊन तात्काळ समाजकंटकांवर कारवाई करण्यात यावी
अन्यथा होणाऱ्या परिणामाची जबाबदारी सर्वस्वी शासनावर राहील याची नोंद घ्यावी असे शेवगाव पोलीस स्टेशन निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात शिवभक्तांनी म्हटले आहे.