इतर

वासुंदे गावची कन्या ऋषीका झावरे ला नीट परिक्षेत ६८० गुण

दत्ता ठुबे
पारनेर – प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील वासुंदे गावची कन्या ऋषीका संतोष झावरे हिने नुकत्याच झालेल्या नीट परीक्षेमध्ये 720 पैकी 680 गुण प्राप्त करून या परीक्षेत बाजी मारली

.पहिल्याच प्रयत्नात नीट व जेईई परीक्षेत बाजी मारली असून सर्व स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
इयत्ता १२ वीला दोन्ही ग्रुपमध्ये चांगले यश संपादन केले आहे. तर जेईई मेंन्स परिक्षेत 98.55% मिळूनही तिने उज्वल यश संपादन केले आहे.ऋषीका झावरे हिची डॉक्टर बनण्याची इच्छा असुन डॉक्टर बनून देशसेवा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. NSEB- नॅशनल स्टॅंडर्ड एक्सामिनेशन for biology मध्ये qualified नॅशनल 1% स्टुडंट्स मध्ये selection झाले होते. NSEB मध्ये महाराष्ट्राच्या २५ विद्यार्थ्यांमध्ये निवड झाली होती.
ऋषीका झावरे हिला आई सौ माया संतोष झावरे, (शिक्षिका ),वडिल डॉ. संतोष बाबाजी झावरे,ग्रुप अ अधिकारी, DGQA, रक्षा मंत्रालय, पुणे यांचे मार्गदर्शन लाभले असून वासुंदे व परिसरातून तिच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. तिच्या या यशाबद्दल डॉ शोभा गायके,डॉ सुनील गायके यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button