इतर

अक्षदा मंगल कलशाचे राजुरमध्ये भव्य स्वागत

शोभायात्रा काढत ‘जय श्रीराम’चा गजर

विलास तुपे

राजूर प्रतिनिधी

— २२ जानेवारीला अयोध्येत नवनिर्मित भव्य मंदिरात भगवान प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यानिमित्ताने घरोघरी निमंत्रण देण्यासाठी अयोध्या येथून आलेल्या अक्षदा व मंगल कलशांचे मंगळवार , दि १९ डिसेंबर रोजी राजुर गावात मा.आ.वैभवराव पिचड यांच्या प्रमुख उपस्थित उत्साहात स्वागत करण्यात आले


प्रभू श्रीरामांची भव्य मूर्ती, , पारंपरिक वाद्यांचा गजर आणि ‘जय श्रीराम’ असा जयघोष करत सकाळी स्वामी समर्थ मंदिरापासून भव्य शोभायात्रेला सुरुवात झाली. फुलांनी सजविलेल्या रथात अयोध्येहुन आलेल्या अक्षदा व मंगल कलश विधिवत पूजा करीत सर्वसामान्य नागरिक आणि रामभक्तांच्या उपस्थित पुष्पवृष्टी करून ठेवण्यात आले. अक्षदा व मंगल कलशाचे ठिकठिकाणी भाविकांनी दर्शन घेत स्वागत केले.

हा सोहळा पाहण्यासाठी ग्रामीण भागातून देखील ग्रामस्थ मोठ्या संख्येने आले होते. चौकाचौकात मंगल कलशांचे पूजन करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. स्वामी समर्थ मंदिरापासून सुरू झालेली शोभायात्रा महादेव मंदिर,विठ्ठल मंदिर दत्तमंदिर मार्गे जावुन प्रभू श्री राम मंदिरात समारोप झाला


यावेळी २२ जानेवारीला अयोध्येत होत असलेल्या कार्यक्रमासाठी अकोले,राजुर शहरासह तालुक्यातुन मोठ्या संख्येने भाविक जाणार आसल्याचा विश्वास मा.आ.वैभवराव पिचड यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी राजुरचे सरपंच, उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य, विश्व हिंदू परिषद राजुर,सकल हिंदु समाज तसेच स्थानिक सर्वपक्षीय राजकीय पदाधिकारी, श्रीरामभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button