अनेक वर्षाची परंपरा असलेल्या भायगाव येथील होळी यंदा पेटवली

युवकांच्या पुढाकाराने होळी सण उत्साहात साजरा
शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव – नेवासा राज मार्गावरील भायगाव येथील नवनाथ बाबा मंदिराच्या प्रांगणात भायगाव येथील तरुणांच्या पुढाकाराने यावर्षी होळी पेटवून होळी सण उत्साहात साजरा करण्यात आला.अनेक वर्षाची परंपरा भायगाव येथील होळीला होती. मात्र मध्यंतरीच्या काळात सार्वजनिक होळी पेटवली गेली नाही.
प्रत्येकाने आपापल्या घरी होळी पेटून हा सण साजरा केला जात होता मात्र गावातील तरुणांच्या पुढाकाराने पारंपारिक चालू असलेला या उत्सवाला या वर्षापासून पुन्हा मोठ्या उत्साहाने सुरुवात करण्यात आली. गावातील तरुणांनी केलेल्या या होळी उत्सवाचे ग्रामस्थांच्या वतीने कौतुक होत आहे.वर्षभर गावात वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडत असतात. या कार्यक्रमांना भायगाव येथील ग्रामस्थ महिला नेहमीच सक्रिय सहभाग घेत असतात म्हणूनच युवकांनी पुन्हा सुरू केलेल्या होळी उत्सवाला ग्रामस्थां सह महिलानी मोठ्या आनंदाने पाठिंबा देऊन कौतुक केले आहे.
या होळी उत्साहासाठी अमोल गणपत आढाव, अक्षय घुले, कडुबाळ आढाव संदिप आढाव, सुनिल आढाव, अमोल देशपांडे, गणेश शेळके, ऋषीकेश नेव्हल,अजित आढाव, ऋषीकेश आढाव, गणेश तांबेरे, नितीन आढाव, नानासाहेब दळे, अभिजित नेव्हल, तुकाराम लोढे, सचिन तांबोरे, प्रवीण तंबोरे, रविंद्र जाधव,यांनी पुढाकार घेतला. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भायगावचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री नवनाथ बाबा मंदिर प्रारंगणात साजऱ्या होत असलेल्या सार्वजनिक होळी उत्सव गेल्या काही वर्षापासून बंद होता. तो पुन्हा मोठ्या उत्साहात साजरा व्हावा अशी सर्वांची धारणा होती. ती तरुणांच्या सहकाऱ्यांनी आम्ही पूर्ण केली याचा खूप आनंद वाटतो.यापुढील काळात धार्मिक काळात कार्यात सर्वांनी मोठ्या उत्साहात सहभागी व्हावे असेही आव्हान यानिमित्ताने करतो.अमोल गणपत आढाव
(भायगाव ,ता शेवगाव)