अहमदनगर

विचारावर आधारित राजकारण करा, गुंडगिरीला थारा देऊ नका विजयराव औटी

पाडळी येथे विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण

दत्ता ठुबे /पारनेर प्रतिनिधी

पाडळी तर्फे कान्हुर ता. पारनेर येथे ८२.५० लक्ष रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण राज्याच्या विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले यावेळी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या बांधकाम व कृषी समिती सभापती मा. काशिनाथ दाते सर होते.

शिवसेना जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले, शिवसेना तालुका प्रमुख विकास रोहोकले, जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबासाहेब तांबे, उपतालुका प्रमुख तुषार बांगर, भाळवणी चे उपसरपंच संदिप ठुबे, माजी चेअरमन गंगाधर रोहोकले, काळकुप चे उपसरपंच विलास सालके, प्रकाश कोरडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यामध्ये प्रजिमा-५०, पाडळी, शिंदे वस्ती ते जामगाव रस्ता डांबरीकरण करणे – ३० लक्ष, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडळी तर्फे कान्हुर चार खोल्या बांधकाम करणे – ३८ लक्ष, स्मशानभूमी सुशोभिकरण करणे -१४.५० लक्ष या कामांचा समावेश आहे.

यावेळी बोलताना मा. आ. विजय औटी म्हणाले सरकार बदलले की निर्णय बदलतात. पाडळी चे सरपंच लोकनियुक्त आहेत अविश्वास येण्याची भीती नसते हा सर्वात मोठा फायदा होता. आपली खुर्ची शाबूत आहे याची जाणीव असली की चांगले काम करता येते आणि हरीश काकांनी चांगले काम करून दाखवले आहे. विकास कधीही न संपणारी प्रक्रिया आहे. माझ्या कार्यकाळात मी असंख्य बंधारे बांधले, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत प्रचंड रस्त्यांची कामे केली. एकच माणूस सतत निवडून येत नाही हेच लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे. समाज जीवनात काम करताना ज्या समाजात आपण राहतो त्याचे काही देणे आहे असे काम आपण केले पाहिजे. समाजासाठी काम करण्याचा भाग म्हणजे निवडणूक असते. यामध्ये हार-जीत होतच असते, निवडणूक जिंकली पाहिजे हा अट्टहास काहीच कामाचा नाही. स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी निवडणूक लढवली नाही सार्वजनिक जीवनात काम करत असताना आपल्या कामात सातत्य असले पाहिजे, समाजाला प्रबोधन करणे, मार्गदर्शन करणे, समाज चुकीच्या दिशेने चालला असेल तर त्यांना रस्त्यावर आणणे, हेच पुढारपण करणार्‍यांचे काम आहे. जबाबदारी आहे आणि या तालुक्यात शिवसेनेचे सर्व पदाधिकारी याची जाणीव ठेवून काम करतायेत. ज्या गोष्टी चुकीच्या घडल्या त्याचे आत्मपरीक्षण करण्यास तुम्ही समर्थ आहात. आज तालुक्यात प्रचंड अस्वस्थता आहे, मुलांना शिक्षणासाठी शाळा निर्माण केल्या, शेतकऱ्यांचा प्रपंच सुखी व्हावा म्हणून बंधारे बांधले, पाऊस पडल्यानंतर शेतीला याचा उपयोग होईल, चांगले उत्पन्न झाल्यानंतर बाजारात नेता यावा म्हणून चांगले रस्ते बनवले, आपण सारे जण मिळून महाराष्ट्राचे सुसंस्कृत विकासाचे भागीदार व्हावे, म्हणून लोकप्रतिनिधी चांगला असावा लागतो. महाराष्ट्र संतांची भूमी आहे अध्यात्म तुम्हाला सांगते की शांततेने जागा, शांततामय जीवन जगायचे असल्यास समृद्ध समाज तयार करा, समृद्ध समाज तयार करायचा असेल तर विचारावर आधारित समाजकारण राजकारण करा, गुंडगिरीला थारा देऊ नका. बिघडलेली सामाजिक व्यवस्था दुरुस्त करण्याची जबाबदारी युवकांनी घेतली तर मी तुमच्यापुढे चार पाऊल राहील. जबाबदारी आपण स्वीकारली पाहिजे आता असे आहे लग्नाला नाही आला, तर जागरणाला येईल, नाही जमलं तर सत्यनारायणाला येईल, नाहीतर बर्थडे आहेच, हीच आपली जबाबदारी असेल तर आपण पुढे कसे जाणार याचाही विचार केला पाहिजे.

( ज्या महाराष्ट्राचे भविष्य यशवंतराव चव्हाणांनी पाहिले, ज्या महाराष्ट्राच्या विधानसभेत आचार्य अत्रे सारखे विद्वान बसले, एस एम जोशी सारखे साधु माणसे बसली, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी शरदराव पवार साहेब, विलासराव देशमुख असे मोठ्या उंचीचे माणसे बसली त्याच सभागृहांमध्ये रात्रीच्या दोन वाजता एखाद्याच्या घरी जाऊन केक आणला आणि आन चाकू, जागरण गोंधळात सहभागी होणारे असल्यास कशी तुलना करायची याचा प्रश्न पडतो. एका बाजूला सेनापती बापटांचा तालुका, शिक्षकांची पंढरी असणारा तालुका, आपण अभिमानाने सांगतो आम्ही सर्वात जास्त शिक्षक महाराष्ट्र ला दिलेत. ही पुण्याई आपण महाराष्ट्राला सांगतो आपण तरुण पिढीला चांगले विचार आचार दिले पाहिजे.)

यावेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम कृषी समिती सभापती काशिनाथ दाते सर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख रामदास भोसले, माजी जिल्हा परिषद सभापती बाबासाहेब तांबे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले

यावेळी कोरोणा काळात उत्कृष्ट काम केल्याबद्दल कोरोणा युद्धांना सन्मानित करण्यात आले, तसेच दहावीच्या परीक्षेत चांगले मार्क मिळून नंबर मिळवलेल्या विद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात आला, नवनिर्वाचित सोसायटीच्या संचालकांना सन्मानित करण्यात आले, तसेच शिवसेना शाखाप्रमुख अक्षय रावसाहेब पोटघन, उपशाखाप्रमुख बालाजी विठ्ठल सिनारे, शिवसेना युवा शाखाप्रमुख शुभम संभाजी सुंबे, उपप्रमुख रोहित बाळासाहेब सुंबे, महिला आघाडी शाखाप्रमुख उषा संपत काळे, उपप्रमुख अंबिका सचिन सुंबे व त्यांच्या कार्यकारिणीतील सदस्यांना नियुक्तीची पत्रे देण्यात आली

यावेळी उपसरपंच अनिता सुंबे, योगेश दावभट, सखाराम सिनारे, प्रमिला सुंबे, गंगाराम सुंबे, सकाहारी सुंबे, गोपाळा डोंगरे, दत्तात्रेय सुंबे, विठ्ठल काळे, संजय पाटील, भास्कर सुंबे, नाना सिनारे, रघुनाथ सिनारे, बाळासाहेब सुंबे, बापू सुंबे, मंजाबापू सुंबे, रोहिदास सुंबे, बाबुराव सुंबे, अशोक सुंबे सर, संपत काळे, बाबाजी काळे, यशवंत सिनारे, जयाबाई दावभट, अश्विनी दावभट, अनिता सिनारे, मंदाबाई सिनारे, ज्ञानदेव सुंबे,शाखा अभियंता जाधव, कामाचे ठेकेदार साहेबराव नरसाळे, इंजि. नागेश रोहोकले इत्यादी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button