पिंपळगाव नाकविंदा येथे महालक्ष्मी विद्यालयात विदयार्थ्यांचे रंगले वार्षिक स्नेहसंमेलन!

योग्य दिशेने केलेले प्रयत्न यशाचा मार्ग उघडतात – अॅड. मनकर.
अकोले प्रतिनिधी
विद्यार्थ्यांना मिळणारे शिक्षण भविष्याची संपत्ती आहे.हाच उद्देश समोर ठेवून संसाराचा गाडा चालवून शिक्षण घेणाऱ्यांचे भवितव्य उज्ज्वल करण्याचे महान कार्य आपल्या मायभूमित होते याचा अभिमान आहे.योग्य वेळी योग्य दिशेने धोरणासह केलेले सर्व प्रयत्न यशाचा मार्ग उघडतात.असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष अॅड.वसंतराव मनकर यांनी केले.
महालक्ष्मी माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय पिंपळगाव नाकविंदा येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले.देशभक्तीपर गिते,रेकॉर्ड डान्स,विनोद,बातम्या, धार्मिक सोहळा,पथनाटय यांद्वारे गुणदर्शन चांगलेच रंगले होते.यावेळी कार्यक्रमांच्या उद्घाटन प्रसंगी अॅड. मनकर बोलत होते.
याप्रसंगी सेवानिवृत्त मुख्याध्यापक राजू आत्तार, ग्रामपंचायतीचे सरपंच लक्ष्मण सोंगाळ,उपसरपंच मारूती काळे,माजी उपसरपंच बबनराव आभाळे,सदस्य नवनाथ जाधव,शालेय समितीचे अध्यक्ष मारूती आभाळे,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष वाळीबा लगड,मनसेचे संपत आभाळे,विष्णु कर्णिक,राम लगड, भाऊपाटील बगनर,प्राचार्य सुनिल धुमाळ,शिक्षक बँकेचे व्हा.चेअरमन अण्णासाहेब ढगे,राज्यपंच अनिल चासकर,विजय भालेराव,विठ्ठल आभाळे,तुकाराम भोर,महेश खांडरे,संकेत येलमामे,संतोष वावळे,सुवर्णा धात्रक,रोहिदास लगड,रामभाऊ जाधव यांसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी,पालक,प्रेक्षक बहुसंख्येने उपस्थित होते.
अॅड.मनकर यांनी पुढे मार्गदर्शन करताना विदयालयाची शिक्षणाची गुणवत्ता वाढत असून पुढे अधिक सक्षम विदयार्थी घडण्यासाठी पालकांनी विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
उपसरपंच मारूती काळे यांनी सुसंस्कृती पिढी घडविण्याचे काम महालक्ष्मी विदयालयात होत आहे.त्यातुनच भावी नागरीक घडणार आहेत.त्यासाठी चांगल्याची संगत धरा. वाईटाचा त्याग करा.आईवडीलांची मान समाजात खाली जाणार नाही याची काळजी घ्या असे विचार व्यक्त केले.
माजी उपसरपंच बबनराव आभाळे यांनी शिस्तीचे महत्त्व सांगुन सर्वांना शांतता राखण्यासाठी आव्हान केले.
सांस्कृतीक कार्यक्रमांमधून विदयार्थ्यांनी उपस्थितांची चांगलीच मने जिंकली.कोरिओग्राफर म्हणून युसुफ मदारी यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.प्रेक्षकांनीही आर्थिक स्वरूपात कलाकारांना दाद दिली.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य सुनिल धुमाळ यांनी केले.तसेच जेष्ठ शिक्षक रामदास कासार यांनी उत्कृष्ट सुत्रसंचलन केले.
