इतर

वरूर येथील पांडुरंग विद्यालयातील विद्यार्थी प्राज्ञिक गोरडे याचे यश


शाहराम आगळे


शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगांव – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत २०२३ – २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एनएमएमएस) परीक्षेत श्री पांडुरंग माध्यामिक विद्यालय वरुर या विद्यालयातील विद्यार्थी प्राज्ञिक राजीव गोरडे याने घवघवीत यश संपादन केले.

तसेच तो छत्रपती शाहू महाराज ‘सारथी’ शिष्यवृत्तीसाठीही पात्र ठरला आहे. विद्यालयातर्फे प्राज्ञिकचा व त्याच्या पालकाचा वरुर सेवा सोसायटीचे चेअरमन मधुकर वावरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

त्यावेळी माजी सरपंच भागवत लव्हाट, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष खडके, साहेबराव रेवडकर, अशोक खांबट आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक सुशीलकुमार नागापुरे, शिक्षक प्रशांत लबडे, जालिंदर शेळके, राजेंद्र जमधडे आदींनी प्राज्ञिकचा त्याच्या उज्वल यशाबद्दल गौरव केला. गणित विषय शिक्षक विकास काळे यांचेही प्राज्ञिकला मार्गदर्शन लाभले. यावेळी मार्गदर्शक शिक्षक शरद भोसले यांचाही सत्कार करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button