
शेवगाव प्रतिनिधी
शासनाने किराणा दुकानात,बेकरी मध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेवून एकप्रकारे तरू पिढीला व्यसनाची
वाट दाखवल्यासारखेच झाले आहे या दारु विक्रीमुळे समाजात अन्याय अत्याचार वाढणार गुन्हेगारी वाढू शकते वाईन विक्रीचे दुष्परीणाम लक्षात
घेवून वाईन विक्रीचा निर्णय त्वरीत मागे घ्यावा अन्यथा स्वाभिमानी मराठा महासंघ तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संघटनेचे संस्थापक डॉ ,कृषिराज टकले यांनी दिला आहे
डॉ कृषिराज टकले यांनी पुढे सांगितले की,वाईन विक्री करून शासनाचा फायदा होवू शकतो शेतकऱ्यांचा नाही वाईन विक्रीमुळे महिला असुरक्षित होतील याचे काय?
शासनाने वाईन विक्री पेक्षा दुध विक्री करावी तरूण पिढी सुधारावी असे आवाहन स्वाभिमानी मराठा महासंघ संस्थापक डॉ कृषिराज टकले,प्रदेश अध्यक्ष सुभाष गागरे,मराठा भुषण चंद्रकांत लबडे,अहमदनगर जिल्हाध्यक्ष अंकुश डांभे,जिल्हा प्रसिद्दीप्रमुख अमोल म्हस्के,आंदिनी केले आहे