इतर
खासगी वाहनांवर पक्षाचे बोधचिन्ह ,झेंडे घोषवाक्य लावण्यास निर्बंध

अहमदनगर-भारत निवडणूक आयोगाने सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी निवडणूक कालावधीत खासगी वाहनावर सक्षम प्राधिकारणाच्या पूर्वपरवानगीशिवाय पक्षाचे बोधचिन्ह लावण्यास निर्बंधाचे आदेश काढले आहेत.
जिल्ह्यात सक्षम प्राधिकरणाच्या पूर्वपरवानगी शिवाय ऑटोरिक्षा, टेम्पो, मोटार सायकल व इतर खासगी वाहनांवर पक्षाचे बोधचिन्ह, झेंडे व इतर घोषवाक्य लिहिणे आदींवर या आदेशान्वये निर्बंध घालण्यात आलेला आहे आदेशाचा भंग करण्याऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार कारवाई केली जाईल, हे आदेश २५ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात लागू राहतील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे