समाजाला योग्य दिशा दाखविण्याचे काम पत्रकार करतात माजी आमदार वैभवराव पिचड

अकोले (प्रतिनिधी)-
पत्रकार हा समाजाचा आरसा असून समाजातील अपप्रवृत्ती,अन्याय या विरुद्ध आवाज उठवीत असतानाच समाजाला योग्य दिशा दाखविण्याचे काम पत्रकार करतात असे प्रतिपादन माजी आमदार वैभवराव पिचड यांनी केले .
‘दर्पण’कार आचार्य बाळकृष्ण जांभेकर यांच्या स्मरणार्थ मराठी पत्रकार परिषद व श्री स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, राजूर यांच्या संयुक्त विद्यमाने राजूर येथे पत्रकार दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सर्व पत्रकारांचा सत्कार माजी आमदार वैभवराव पिचड, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे, मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.यावेळी ते बोलत होते
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे उत्तर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य होते. यावेळी राजूर चे उपसरपंच संतोष बनसोडे, युवक कार्यकर्ते निलेश साकुरे,जेष्ठ पत्रकार श्रीनिवास येलमामे, शांताराम काळे, प्रकाश महाले, विद्याचंद्र सातपुते, राजेंद्र जाधव, विनायक घाटकर, युवराज हंगेकर,गणेश आवारी, आबासाहेब मंडलिक, प्रशांत देशमुख,अण्णासाहेब चौधरी,अमोल पवार, प्रदीप कदम,अनिल नाईकवाडी, युवराज हंगेकर, विनायक साळवे, प्राचार्या सौ. मंजुश्री काळे, मुख्याध्यापक विलास महाले,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी वैभवराव पिचड पुढे म्हणाले की, दर्पणकार आचार्य बाळकृष्ण जांभेकर यांनी इंग्रजाविरुद्ध पत्रकारितेच्या माध्यमातून आवाज उठवीला. समाजातील अनेक प्रश्नांना वाचा फोडली तोच वारसा व परंपरा आजचे पत्रकार करीत आहे. समाजाचा आरसा म्हणून ते काम करीत आहे. पत्रकारांनी समाजामधील प्रश्न व समस्या यांना वाचा फोडावी. जे समाजाला अपेक्षित आहे व समाज हिताचे आहेत ते मांडावे व समाजात पुढे काय घडले पाहिजे याचे ही मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा व्यक्त करून सर्व पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांनी पत्रकारांना शुभेच्छा देतांना म्हणाले की, राजूर पोलीस स्टेशन च्या सर्व कामगिरी, राबविण्यात आलेले उपक्रम यांना प्रसिद्धी देऊन आमच्या पाठीशी राहिलेले आहेत. त्या बद्दल त्यांनी सर्व पत्रकारांचे ऋण व्यक्त केले.
यावेळी अध्यक्षीय मनोगतात अमोल वैद्य म्हणाले की, विदयार्थ्यांना पत्रकारिता क्षेत्रात काम करण्याची मोठी संधी आहे. मात्र त्यासाठी कष्ट करण्याची तयारी ठेवावी लागते. समाजातील विविध घडामोडीवर लक्ष ठेवावे लागते. समाजाचे प्रश्न ,समस्या सोडविताना अनेक वेळा संघर्ष करावा लागतो.त्यातून पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल केले जातात,हल्ले होत असतात.मात्र अशाही परिस्थितीत ग्रामीण भागातील पत्रकार आपले काम प्रामाणिक व चोख बजावत असतात. अकोले तालुक्यातील पत्रकारितेला मोठी परंपरा आहे. जिल्ह्यात नव्हे तर राज्यात वैशिष्ट्यपूर्ण लिखाना मुळे पत्रकारांचा नावलौकिक आहे.येथील ज्येष्ठ पत्रकारांनी नवीन पिढीला नेहमी सकारात्मक मार्गदर्शन केले आहे.मराठी पत्रकार परिषदेच्या निमित्ताने विविध सामाजिक व विधायक उपक्रम राबविले जाते व पत्रकारांच्या प्रश्नी आवाज उठविणारी सर्वात जुनी मातृसंस्था म्हणून परिषदेकडे पाहिले जात असल्याचे सांगून येथील पत्रकारितेची यशस्वी परंपरा, वसा यापुढे टिकवून ठेवण्यासाठी सर्व नवोदित पत्रकार आपापल्या पध्दतीने काम करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शांताराम काळे, जिल्हा सल्लागार विद्याचंद्र सातपुते, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रशांत देशमुख ,राजूर चे उपसरपंच संतोष बनसोडे आदींनी मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक व स्वागतात प्राचार्या सौ. मंजुशा काळे यांनी संस्था व विद्यालयाच्या उभारणीसाठी पत्रकारांचे मोठे योगदान असल्याचे सांगून पत्रकार दिनाच्या निमित्ताने कृतज्ञता व्यक्त करण्याची ही संधी असल्याचे सांगितले .सूत्रसंचालन किरण भागवत यांनी केले तर आभार अनिल नाईकवाडी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी, विनायक साळवे, किरण भागवत,सतीश काळे, रोहिणी पिचड, आदि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
यानंतर राजूर पोलीस स्टेशनमध्ये सहा.पोलिस निरीक्षक प्रविण दातरे यांनी पत्रकारांचा सन्मान केला.
