इतरग्रामीण

खेडले परमानंद च्या ग्रामसभेला पदाधिकाऱ्यांची दांडी! , सरपंचां सह गैरहजर सदस्यां वर कारवाईचा ठराव !

दत्तात्रय शिंदे
माका  प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील खेडले परमानंद ग्रामपंचायत ची ग्रामसभा चांगलीच वादळी झाली गावचे सरपंचा सह अनेक  सदस्यांनी ग्रामसभेला दांडी मारली

उपसरपंच यांचे अध्यक्ष खाली ही ग्रामसभा पार पडली ग्रामसभेला अनुपस्थित असणारे सदस्य आणि सरपंचांवर  कारवाई करावी असा ठराव यावेळी संमत करण्यात आला

कोरोना नंतर अनेक दिवसांच्या कालावधीनंतर झालेल्या या ग्रामसभेला ग्रामपंचायत सदस्यांपैकी  अवघ्या तीन सदस्यांची उपस्थिती या ग्रामसभेसाठी होती.
सरपंचाच्या गैरहजेरी मुळे ग्रामस्थांमध्ये संभ्रम व
गोंधळ निर्माण झाला. त्याचप्रमाणे गावातील
विकास सेवा संस्थांचे प्रतिनिधी तलाठी हे
सुद्धा या ग्रामसभेत गैरहजर असल्याचे चित्र दिसून आले। ग्रामसभेचे अध्यक्षपद ग्रामपंचायतचे उपसरपंच
जावेद इनामदार यांनी भूषवले या प्रसंगी ग्रामसेवक
फरताडे व तंटामुक्तीचे अध्यक्ष दगू बाबा हवालदार
यांनी अनेक प्रश्नांना सडेतोड उत्तरे दिली.
ग्रामसभेमध्ये गावातील विविध विकास कामांचे
प्रश्न उपस्थित झाले. यामध्ये प्रामुख्याने रेशन
धारकांचा प्रश्न समोर आला रेशन कार्ड मिळून
किमान सहा महिने होऊनही अद्याप
शिधापत्रिकेवरील शिधा मिळत नसल्याने गरीब
गरजवंत नागरिकांनी  नाराजी  व्यक्त केली ,

घरकुल योजनेतील सर्वे दरम्यान गरीब लाभार्थींची
नावे जाणीवपूर्वक डावलण्यात  आल्याची तक्रार यावेळी करण्यात आली अनेक घरकुलांची कामे अपूर्ण आहेत त्यामुळे नवीन घरकुलाची यादी तयार होण्यास अडचण निर्माण होत आहे हा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला. गावाला
गावठाण असूनही काही गरीब गरजू लोकांना जागे-
अभावी घरकुल मिळत नसल्याचे सांगितले

या सारख्या अनेक प्रश्नांचा भाडीमार ग्रामस्थांनी
ग्रामसेवक व ग्रामसभेचे अध्यक्ष यांच्यासमोर केला.
ग्रामस्थांच्या प्रश्नांमुळे ग्रामसभा अध्यक्षांसह ग्रामसेवकांची  चांगलीच भंबेरी उडाली.
अवैध वाळू उपसा, अवैध दारू व्यवसाय
ग्रामसभेला गैरहजर असलेल्या सरपंच, तलाठी व
सदस्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी,
शासनाच्या अतिक्रमण झालेल्या जागेची चौकशी
करून ज्यांना जागा नाही त्यांना त्या उपलब्ध
करून देण्यात याव्यात अशा प्रकारचे ठराव ग्रामसभेत
प्रामुख्याने संमत करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button