इतर

ग्राहक संरक्षण समितीच्या जिल्हाकार्याध्यक्ष पदी संतोष सोबले

पारनेर प्रतिनिधी :
तालुक्‍यातील सोबलेवाडी येथील पत्रकार संतोष सोबले यांची नुकतीच ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड जाहीर झाली असून ग्राहकांच्या प्रश्नांवर संतोष सोबले हे बऱ्याच दिवसापासून काम करत आहेत. ग्राहक वर्गाला न्याय देण्यासाठी ते प्रयत्नशील असतात पत्रकार म्हणूनही ते काम करत असून पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी ग्राहकांच्या अनेक प्रश्नांना आजपर्यंत वाचा फोडली आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून ते करत असलेले सामाजिक काम हे उल्लेखनीय आहे. त्या माध्यमातून त्यांनी ग्राहकांच्या प्रश्नांनाही न्याय दिला आहे. त्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे व राष्ट्रीय सचिव हर्षद गायधनी यांच्या वतीने त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले आहे.
त्यांनी यापूर्वी पारनेर तालुका कार्यकारणी मध्ये ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीमध्ये काम केलेले आहे. पत्रकार संतोष सोबले हे राज्य मराठी पत्रकार संघाचे पारनेर शहराध्यक्ष म्हणूनही कार्यरत असून पत्रकारितेत त्यांचे काम सुरू आहे.
निवडीनंतर बोलताना संतोष सोबले म्हणाले की ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीने माजी जिल्हाध्यक्षपदी निवड करून माझ्या ग्राहकांच्या संदर्भात सुरू असलेल्या कामाला न्याय दिला आहे. ग्राहकांच्या अनेक समस्या असतात प्रश्न असतात परंतु त्यावरती पाहिजे तसा आवाज उठवला जात नाही. परंतु आपण ग्राहकांच्या समस्यांवर काम करत आहोत पारनेर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची खते बी-बियाणे व शेती अवजारे विकत घेतल्यानंतर फसवणूक होत असते. त्यामुळे विशेष करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ग्राहक संरक्षण समितीच्या माध्यमातून मी काम करणार आहे. त्यामुळे ग्राहकांच्या विविध प्रश्नांवर काम करून ग्राहक वर्गाला मी न्याय मिळवून देण्याचा यापुढील काळात ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या माध्यमातून निश्चितच प्रयत्न करेल.
ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्षपदी संतोष सोबले यांची निवड झाल्यानंतर
ज्येष्ठ पत्रकार शशिकांत भालेकर, राज्य मराठी पत्रकार संघ अहमदनगर जिल्हा सचिव दत्ता गाडगे, पारनेर तालुका इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार गणेश जगदाळे, उद्योजक राजू बेलोटे,राजु ठुबे, दत्ता शेठ ठाणगे,राहुल बुगे, नवनाथ गाडगे, संकेत पावडे, शिवाजी भागवत, मंगेश लाळगे, दिनेश गट, गणेश चव्हाण आदी सहकाऱ्यांनी यावेळेस निवडीबद्दल अभिनंदन केले. व सोबले यांच्या पुढील सामाजिक कार्यास शुभेच्छाही दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button