सिद्धार्थ वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे निसर्ग पर्यटन!

राजेंद्र करंदीकर आणि सामाजिक कार्यकर्त्या दिपाली भोसले यांचा स्तुत्य उपक्रम.
पारनेर दि.१३ /पारनेर प्रतिनिधी
आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्याची संधी फार कमी मिळते. पण निसर्गाच्या सानिध्यात घालवलेला एक दिवस खूप आनंददायी आणि उत्साही असतो हाच प्रामाणिक उद्देश लक्षात घेऊन राजेंद्र करंदीकर आणि सामाजिक कार्यकर्त्या दिपाली भोसले यांनी पारनेर शहरातील सिद्धार्थ वसतिगृहातील गोर गरीब विद्यार्थ्यांना मोफत भंडारदरा धम्मसहल व पर्यटन घडवून आणले. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित झाल्याचे दिसून आले.

सिद्धार्थ वसतिगृहातील गोर गरीब विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमा निमित्त अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण येथे पर्यटन घडवून आणले. निसर्गाचे सानिध्यातील पक्ष्यांचे आवाज, हिरवीगार दाट जंगले, विविध पाने , फुले, पक्षी, पाहण्यात खूप आनंद विद्यार्थ्यांनी लुटला. उंच डोंगर दर्यावरून कोसळणारे पाणी हे विहंगमय दृश्य डोळ्याचे पारणे फेडणारे होते. डोंगर दर्यावर कोसळणाऱ्या नदीतून झुळझुळ वाहणारे पाणी. या पाण्यात या विद्यार्थांनी पोहण्याची आनंद घेतला. रिमझिम पावसाने ओलेचिंब वातावरणातील थंडावा व पर्यटन हा अनुभव आनंददायी आणि उत्साही होता.