रामलला प्राणप्रतिष्ठा निमित्ताने सोनईत भव्य शोभायात्रा!

-( विजय खंडागळे )–
सोनई प्रतिनिधी
अयोध्या नगरीतील प्रभु रामलला प्रतिष्ठाण सोहळा निमिताने नेवासा तालुक्यातील सोनई व परिसरात भक्तिमय वातावरणात शोभायात्रा धार्मिक सोहळा मोठ्या उत्साहात पार पड़ला.
या शोभायात्रेत प्राचीन काळतील रामायणतील पाउलखुणा आठवण म्हणून लहान, मोठ्या तरुणानी, , राम, लक्षमण, भरत, शत्रुघ्न,सीता,हनुमान,रावण वध ,लव, कुश, अश्व,वाल्मीकि ऋषि,शबरीची पर्नेकुटी, लक्षमण रेषा,आदि वेशभूषा सुंदर देखावे करुन, जय श्री राम च्या जय घोष, केला , पुरातन रामायण प्रत्यक्षात पाहण्याचा आनंद , नागरिकानी लुटला.सर्व परिसर राममंय झाला होता.
या आनंद सोहळ्यात मुळा एजुकेशन, महाविद्यालय, विद्यालय, आदर्श विद्यालय, किंगडम स्कुल, सुजाता स्कुल, स्मार्ट किडस स्कुल,मधील विद्यार्थी, विद्यर्थीनी, परिसरातील मान्यवर निमत्रित, ग्रामस्थ,मृदंग, भजनी मंडळ, वारकरी पंथ यांनी या धार्मिक कार्यात मोठा सहभाग नोदवाला.
सर्व मंदिर फुलानी, ध्वजानी स्वच्छतने उजाळून निघाले होते, भाविकानी दिवसभर दर्शनचा व महाप्रसादचा आनंद घेतला. स. पो. नी. आशिष शेळके यांनी पोलिस बंदोबस्त चोख ठेवला होता. दुपारी 12 वाजल्या नतर महाआरती करण्यात आली.
पुरातन रामझीरा राममंदिर व पेठेतील राममंदिरात सपत्निक विधिवत पूजा, वेदशास्त्र सम्पन्न पुरोहिताच्या वेदघोषात करण्यात आली होती.

श्रीराम मंदिरासाठीच्या उभरणीसाठी प्रदीर्घ संघर्ष करावा लागला, तो केवळ लोकसहभाग व नियोजनबद्द प्रयत्न केल्याने एका सघर्षशाची यशस्वी सागता झाली.–सुनील गडाख,
(मा. सभापती, पशुसवर्धन व बाधकाम विभाग, जिल्हा परिषद नगर.)