उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश मिसाळ यांचा मुंबईत सन्मान

सोनई –नेवासा तालुक्यातील गणेशवाड़ी येथील मूळ निवासी व नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून कार्यरत असलेले व नवापुर मतदार नोदणी अधिकारी कार्यभार उत्कृष्ट पणे कामकाज केल्याने गणेश मिसाळ यांना लेखिका डॉ. निर्मोही फड़के यांच्या हस्ते आज राष्ट्रीय मतदार दिनाच्या अनुषंगाने मुंबई येथील जय हिंद महाविद्यालय चर्चगट येथे सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे लेखिका डॉ. निर्मोही फड़के होत्या.राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे,मुंबई उपनगरचे जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले,मुंबई शहरचे जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र शिरसागर,जयहिंद महाविद्यालयचे प्राचार्य डॉ.विजय दाभोळकर हे उपस्थित होते.
गणेश मिसाळ हे नंदुरबारचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून जून 2023 पासून अतिरिक्त पदभार सभाळत आहे. मूळ पद-जिल्हा पुरवठा अधिकारी व नवापूर मतदार नोंदणी अधिकारी हे कामकाज सांभाळून निवडणुकीचे कामकाज पहात होते.अतिरिक्त कामकाज असूनही नंदुरबार जिल्ह्यातील निवडणुकीचे कामकाज हे अतिशय उत्तम प्रकारे पार पाडले.
नंदुरबार आदिवासी दुर्गम जिल्हा असूनही नव मतदार नोंदणी मध्ये व मतदार यादी शुद्धीकरणामध्ये नंदुरबार जिल्हा हा राज्यात अग्रेसर ठरलाने जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ हे उत्कृष्ठ अधिकारी म्हणून पात्र ठरले आहे.यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.