राजुर येथील शासकीय आय टी आय चे क्रांतिकारक राघोजी भांगरे नामांतर!

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,
राजुर चा नामांतरण सोहळा संपन्न
अकोले प्रतिनिधी
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, राजुर यांचा नामकरण सोहळा दिनांक 11/10/2024 रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री ना राधाकृष्ण विखेपाटील यांच्या हस्ते अभासी पद्धतीने संपन्न झाला.
राजुर परिसरातील देवगाव चे सुपुत्र क्रांतिकारक राघोजी भांगरे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था राजुर तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर असे नामकरण झाले.
यानिमित्त तालुक्याचे आमदार डॉ किरण लहामटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व त्यांच्या शुभहस्ते कोणशिलेचे अनावरण करण्यात आले. तसेच संस्थेच्या स्मार्ट क्लासरूमचे आमदार साहेबांनी उद्घाटन केले.
राघोजी भांगरे यांचे वंशज श्री धोंडू भांगरे व श्री हरिभाऊ भांगरे यानी कार्यक्रमासाठी उपस्थित राहून राघोजी भांगरे यांच्या कार्याचा आढावा सांगून शासनाचे धन्यवाद मानले.
सदर कार्यक्रमाची प्रस्तावना संस्थेचे प्राचार्य श्री संजय कुटे यांनी मांडली तर सर्वोदय विद्यालय राजूर चे मुख्याध्यापक श्री बादशाह ताजणे यांनी राघोजी भांगरे यांच्या कार्याची माहिती स्पष्ट केली.
सामाजिक कार्यकर्ते ॲड दत्तात्रय निगळे व विनयजी सावंत हे कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे वरिष्ठ निदेशक श्री मंडलिक एस के यांनी केले तर कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व पाहुण्यांचे संस्थेचे गटनिदेशक श्री अर्जुनराव नागरे यांनी आभार व्यक्त केले. सदर कार्यक्रमासाठी संस्थेतील सर्व शिल्पनिदेशक, कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.