नूतन कला महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा.

संगमनेर-दि. २५ जाने २०२४ रोजी नूतन महाविद्यालयात राजापूर येथे राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष कडलग उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. ग. स. सोनवणे कार्यक्रमाला उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतात मतदान करणे हे प्रत्येक नागरिकांचा मूलभूत अधिकार असून तो आपणास संविधानाने बहाल केलेला आहे. असे मत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. हारदे सर यांनी कार्यक्रमाचा उद्देश समजावून सांगितला. यावेळी प्रा. खरात सर, प्रा. हांडे मॅडम यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. सुभाष कडलग यांनी मतदानाबाबत लोकांची बदलत चाललेली मानसिकता, आजची राजकीय स्थिती आणि तरुणांची भूमिका याबाबत आपले मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. प्रविण आहेर सर यांनी केले तर प्रा.अश्विनी भालेराव मॅडम यांनी आभार मानले.
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त महाविद्यालयात रांगोळी स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, पोस्टर स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.