मध्ययुगीन भारताचा इतिहास या पुस्तकाचे राज्यपालांचे हस्ते प्रकाशन

संगमनेर प्रतिनिधी
संगमनेर येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे यांच्या मध्ययुगीन भारताचा इतिहास या पुस्तकाचे प्रकाशन उद्या दिनांक 28 रोजी सायंकाळी 5.30, वाजता केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्या शुभहस्ते व महाराष्ट्रातील नामवंत व्याख्याते, विचारवंत अविनाश धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आले आहे.
अनिल नागणे यांनी स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल असे अत्यंत अभ्यासपूर्ण पुस्तक लिहिले आहे. नागणे हे संगमनेर पंचायत समितीमध्ये गेले काही वर्षांपासून गट विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. अत्यंत अभ्यासू अधिकारी म्हणून त्यांना ओळखले जाते .महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करणे, मुलाखतीची तयारी व अभ्यासाची पद्धती या संदर्भात सातत्याने ते मार्गदर्शन करत आले आहेत. त्यांचे हे पुस्तक प्रकाशन उद्या सायंकाळी साडेपाच वाजता पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे. स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना निश्चित भावेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे असे आव्हान चाणक्य परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.