नेप्तीत समता परिषदेच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा .

अहमदनगर :नगर तालुक्यातील नेप्ती येथे संत सावता महाराज मंदिराच्या पटांगणात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
नेप्ती विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनी काढलेल्या प्रभात फेरीत देशातील महात्मे व महापुरुषांची वेशभूषा परिधान करून सर्वांचे लक्ष वेधले .या प्रभात फेरीत व्यसनमुक्ती प्लास्टिक मुक्तीचा संदेश देण्यात आला .भारत मातेच्या जय घोषणांनी गावचा परिसर दणाणून निघला. झेंड्या भोवती सडा रांगोळी टाकून आकर्षक फुलाची सजावट करण्यात आली होती.
संत सावता महाराज मंदिर पटांगणात समता परिषदेचे युवा नेते तुषार भुजबळ यांच्या हस्ते तर ग्रामपंचायत कार्यालयासमोर सरपंच सविता संजय जपकर यांच्या हस्ते, तसेच प्राथमिक शाळेत उपसरपंच संजय जपकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी गुणवंत विद्यार्थी व खेळाडूचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला .यावेळी देशभक्तीपर कार्यक्रम सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी या समता परिषदेचे तालुका अध्यक्ष रामदास फुले, माजी सरपंच अंबादास पुंड ,माजी उपसरपंच जालिंदर शिंदे, भानुदास फुले, शाखाध्यक्ष शाहूराजे होले , युवा सेनेचे उपतालुकाप्रमुख विनायक बेल्हेकर , संतोष बेल्हेकर, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ पुंड ,पाराजी चौरे, मेजर अशोक पवार, प्रा.भाऊसाहेब पुंड, रमेश रावळे ,हर्षल चौरे ,दत्ता कळमकर, श्रीनिवास जपकर ,आसिफ सय्यद ,मुख्याध्यापक महेश जाधव, सुरेश कार्ले, बाबासाहेब भोर, राजेंद्र झावरे, नानासाहेब घोडके, संतोष खरमाळे, बाबुलाल सय्यद, शिवाजी जाधव, राजेंद्र सांगळे, राधिका वामन, श्रद्धा भांड, अश्विनी पवार, सीमा जपकर,सुनिता परभणे,शिक्षक, समता सैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.