प्रजासत्ताक दिनी नेप्तीत पोपट मोरे यांच्याकडून विद्यार्थ्यांना दप्तराचे वाटप

अहमदनगर :नगर तालुक्यातील नेप्ती येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनी काढलेल्या प्रभात फेरीत देशातील महात्मे व महापुरुषांची वेशभूषा परिधान करून सर्वांचे लक्ष वेधले .या प्रभात फेरीत व्यसनमुक्ती प्लास्टिक मुक्तीचा संदेश देण्यात आला .
भारत मातेच्या जय घोषणांनी गावचा परिसर दणाणून निघला. झेंड्या भोवती सडा रांगोळी टाकून आकर्षक फुलाची सजावट करण्यात आली होती. ग्रामपंचायत कार्यालयासमोर सरपंच सविता संजय जपकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत उपसरपंच संजय जपकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले
.राष्ट्रध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत व ध्वजगीताचे गायन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते पोपट मोरे यांनी आपणही समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून सामाजिक बांधिलकी जपून शालेय गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत दप्तराचे वाटप करून आगळा वेगळा उपक्रम राबवून समाजात आगळावेगळा सदेश देण्याचा प्रयत्न केला. गरीब विद्यार्थ्यांना मोफत दप्तर देण्यात आल्याने संदेश कार्ले सर यांनी पोपट मोरे यांचे आभार मानले. ग्रामस्थवतीने विद्यार्थ्यांमध्ये खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते अमोल चौगुले, रामदास फुले, दत्ता कांडेकर, नानासाहेब होळकर, मुख्याध्यापिका पदमा मांडगे ,सुरेश कार्ले, आशा ढोले, नूतन पाटोळे, मीना काठमोरे, सरपंच सविता जपकर ,उपसरपंच संजय जपकर, ग्रामपंचायत सदस्य शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.