श्री भैरवनाथ सेवा मंडळाचा हिरक महोत्सव साजरा

अकोले- श्री भैरवनाथ सेवा मंडळ मुंबई आणि नोकरस्टाप कमिटी अबिटखिंड या मंडळाच्या कार्यकारिणीने मंडळाच्या हीरक महोत्सवी वर्षाच्या संस्मरणीय कार्याचा आढावा घेण्यासाठी, ग्रामस्थ, सेवानिवृत्त आणि व्यवसाय – नोकरी करणाऱ्या सभासदांचा भव्य स्नेहसंमेलन मेळावा कार्यक्रम रविवार, दिनांक २८ जानेवारी २०२४ सकाळी ९ वाजता सर्वोदय विद्या मंदिर अबितखिंड येथे आयोजित करण्यात आला होता. सर्व व्यवसायिक, नोकरदार मित्रमंडळीना एकत्र आणून ग्रामस्थांच्या सहकार्याने, त्यांच्या मध्ये एकोपा निर्माण करण्याचा व अल्पशी ओळख करुन देण्याचा मंडळाचा हा गोड प्रयत्न यशस्वी पणे सफ़ल झाला.
पहिले हे मंडळ मुंबई पुरतेच मर्यादित होते परंतु मुंबईकरांनी आता गावासाठी सर्व नोकरदारांना, व्यावसायिकांना एकत्र घेऊन समाजप्रबोधन आणि समाज विकास साधण्याचं स्वप्न उराशी बाळगून नव्याने मंडळाचा विस्तार केला आहे. त्या दृष्टीने सर्वांना समावेश असे मंडळाचे नविन नाव सर्वानुमते श्री भैरवनाथ सेवा मंडळ अबितखिंड (नोकरदार ग्रामिण व मुंबई) असे ठेवण्यात आले.
या प्रसंगी मंडळातील सेवानिवृती धारकांचा गुलाबाचे पुष्प, नारळ आणि सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये श्री सुधाकर भिकाजी गोडे, ह.भ.प. यशवंत बुवा घनकुटे, श्री सावळेराम बुवा घनकुटे, बाळासाहेब भिकाजी गोडे (गुरुजी), श्री शंकर शिवराम गोडे, श्री मधुकर गोविंद जगधने, श्री अशोक गोविंद जगधने, श्री वसंत सखाराम घनकुटे, देवराम लक्ष्मण भवारी, श्री सिताराम किसन गोडे, श्री लक्ष्मण नामदेव भोजने, श्री दुलाजी तुकाराम भोजने, श्री नामदेव रामजी भोजने, श्री अनंता भागाजी तिटकरे, श्री मारुती यशवंत भवारी, श्री रामनाथ पांडुरंग भवारी, श्री धोंडिबा रामभाऊ भोजने यांचा समावेश होता.

गावातील विविध मान्यवरांचा पण सत्कार या प्रसंगी करण्यात आला. तसेच ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी तर्फे गावातील गरजू शेतकऱ्यांना विमा वाटप करण्यात आले. या प्रसंगी सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती
भव्य संमेलन यशस्वी करण्यामध्ये मंडळाचे अध्यक्ष्य श्री रामनाथ भोजने, उपाध्यक्ष श्री भानुदास घनकुटे, सचिव श्री सुनिल शिंदे, उपसचिव श्री भाऊसाहेब जगधने, खजिनदार श्री लालजी भोजने आणि श्री सुधाकर गोडे, मंडळाचे हिसोब तपासणीस श्री सुरेश भवारी आणि चंद्रकांत घनकुटे, सदस्य श्री जालिंदर घनकुटे आणि श्री संजय शिंदे यांनी मोलाचे योगदान दिले.
या कार्यक्रमासाठी गावचे सरपंच, सौ. यमुनाताई घनकुटे, श्री जानकीराम गोडे (चेअरमन सोसायटी), श्री शांताराम घनकुटे (तंटामुक्ती अध्यक्ष), श्री विजय घनकुटे (अध्यक्ष आदिवासी सेवा शिक्षण प्रसारक), सौ. लता गोडे (कोतवाल), श्री कारभारी भोजने (मा. सरपंच), श्री भरत अहिलु गोडे, श्री गोविंद घनकुटे (गुरुजी), डॉ. सखाराम घनकुटे, श्री दिपक राऊत सर, श्री सोमनाथ वाजे सर, श्री केशव घनकुटे, श्री विश्वनाथ घनकुटे, श्री सावळेराम मुठे, श्री मुरलीधर घनकुटे, श्री सीताराम राऊत, श्री मारुती तू. घनकुटे, श्री किसन तुकाराम गोडे, श्री नामदेव बोऱ्हाडे , श्री सखाराम लक्ष्मण घनकुटे, श्री जानकू शिंदे, श्री काशिनाथ भारमल, श्री पोपट घनकुटे, श्री प्रकाश घनकुटे, श्री तुळशिराम घनकुटे, श्री दिगंबर घनकुटे, श्री दिलीप भारमल, श्री महेंद्र गोडे, श्री अनिल भोजने, श्री प्रदिप गोडे, श्री विपुल शिंदे, श्री पांडुरंग गोडे, श्री विजय रं घनकुटे, श्री सखाराम गंभीरे, श्री गोविंद गोडे, श्री संदीप घनकुटे, श्री निवृत्ती गोडे, श्री काशिनाथ घनकुटे, मारुती द. घनकुटे, श्री लक्ष्मण अहिलु गोडे, श्री गोपीनाथ तिटकारे , श्री वसंत घनकुटे, श्री नितीन गोडे, श्री संतोष शिंदे, श्री प्रवीण मुठे, श्री दिलीप भारमल , श्री लक्ष्मण अहिलु गोडे, कैलास राऊत, दशरथ गोडे उपस्थित होते.
शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
