जायनावाडी येथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न.

अकोले/प्रतिनिधी-
अकोले तालुक्यातील जायनावाडी पाडोशी या गावामध्ये जिल्हा परिषद सदस्या सुषमाताई दराडे व जिल्हा परिषद जायनावाडी शाळेच्या मुख्याध्यापिका गवळी मॅडम यांच्या उपस्थितीत हळदी कुंकवाचा कार्यक्रम पार पडला.
प्रत्येक गावामध्ये असेच नवनवीन कार्यक्रम झाले पाहिजे. प्रत्येक महिलांनी नवीन बचत गट करून सर्वांनी सक्षम बनल पाहिजे.नवनवीन योजनांचा लाभ घेतला पाहिजे.प्रत्येकी दहा महिला मिळून आपल्या गावात काही नवीन यंत्रणा चालू केली पाहिजे.उदा पापड,शिलाई मशीन,औषधी वनस्पती,बाळ हिरडा, कडधान्य, यांचे उत्पादन आपल्या गावात वाढवले पाहिजे.जेणेकरून आपल्याच गावात रोजगार उपलब्ध होईल.प्रत्येक स्त्री सक्षम झाली पाहिजे ती आर्थिक दृष्ट्या सक्षम झाली पाहिजे बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी सक्षम झाले पाहिजे.असे कार्यक्रमाच्या वेळी जिल्हा परिषद सदस्या सुषमाताई दराडे यांनी बोलताना सांगितले.
जायनावाडी हे गाव अकोले तालुक्यातील अतिशय दुर्गम भागात असून या गावांमध्ये असे नवीन कार्यक्रम होत असतात यामध्ये सर्व महिलांनी मोठ्या संख्येने भाग नोंदवला पाहिजे.असेच कार्यक्रम पुढे चालत ठेवावे असे बोलताना जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका गवळी मॅडम यांनी सांगितले.यावेळी उपस्थित जायनावाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच मनीषा भांगरे, कावेरी भांगरे,अलका भांगरे, शितल भांगरे,जनाबाई भांगरे,व गावातील सर्व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हळदी कुंकवाचा कार्यक्रम पार पाडला.यावेळी प्रमुख पाहुण्यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका गवळी मॅडम यांनी आभार मानले.