जिल्हा स्तरीय गणित विज्ञान प्रदर्शनात कोतुळेश्वर विद्यालयाचे सुयश

शासकीय चित्रकला परीक्षेचा 100% निकाल
कोतुळ प्रतिनिधी
दि. ०१ ते ०३ फेब्रुवारी २०२४ दरम्यान अहमदनगर येथे झालेल्या जिल्हा स्तरीय गणित विज्ञान प्रदर्शनात गणित विभागात कोतुळ ता अकोले येथील कोतुळेश्वर विद्यालयाने जिल्ह्यात प्रथम
क्रमांक मिळविला
इयत्ता १० वी च्या वर्गातील विद्यार्थी साहिल संदीप गिते हा विद्यार्थी सहभागी झाला
होता. त्याने त्रिकोणमितीवर आधारित हिप्सोमीटर (उच्चतामापी) हे उपकरण बनवले होते. याचा उपयोग अतीउंच
इमारती, झाडे, पर्वत इ. प्रत्यक्ष न मोजता त्रिकोणमितीचा उपयोग करून अचूक उंची काढता येते. या विद्यार्थ्यास गणित विषय शिक्षक श्री.टी. पी.देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.
त्यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. इरनक के. डी., विज्ञान शिक्षक श्री. दुसुंगे के. एम. व इतर विज्ञान शिक्षकांनी सहकार्य केले.
तसेच विद्यालयाचा शासकीय चित्रकला परीक्षा (इंटरमेजिएट व एलिममेंटरी) सन २०२३-२४ चा १००% निकाल लागला
परीक्षे साठी एकूण २५ विद्यार्थी बसले होते. या विद्यार्थ्यांना श्री. लांघी एस. व्ही.
यांचे मार्गदर्शन लाभले. विभाग प्रमुख श्रीमती साबळे व्ही. सी. मुख्याध्यापक श्री. इरनक के. डी., पर्यवेक्षक श्री. पाळंदे यु. एम. व सर्व कला शिक्षक यांनी सहकार्य केले. विद्यालयाच्या या यशाबद्दल स्कूल
कमिटी, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक सर्व सेवक वृंद व ग्रामस्थ यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
