इतर
नारायणगाव येथे सायकल स्पर्धाचे आयोजन

नारायणगाव दि. २८
सायकलिंग असोशियन महाराष्ट्र पुणे यांच्या मान्यत्येनं अर्थसंपदा नागरी पतसंस्थेच्या वतीनेनारायणगाव (ता. जुन्नर) येथे रविवारी (दि. २) जिल्हास्तरीय सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेचा मार्ग पुरुष गटासाठी नारायणगाव आठवडे बाजार ते हिवरे खुर्द (२० कि. मी.) परतीचा प्रवास, महिलांच्या खुल्या गटासाठी परीटवाडी (१२ कि. मी.)
परतीचा प्रवास, तर लहान गटासाठी कारखाना फाट्यापर्यंत (१० कि.मी.) परतीचा प्रवास असणार आहे.या स्पर्धेतून ‘सायकल चालवा स्वास्थ्यासाठी’ हा संदेश देण्यात
येणार असल्याचे स्पर्धेचे आयोजक रमेश मेहेत्रे यांनी सांगितले