क्राईम
बालाजी देडगाव परिसरात अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला

माका प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव परिसरात कॅनॉल मध्ये एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला
तालुक्यातील बालाजी देडगाव येथील दळवी वस्ती शेजारी असणाऱ्या पाथर्डी कॅनॉल मध्ये (पाटामध्ये)३० ते ३५ वय असणाऱ्या तरुण युवकाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
अजूनही मृतदेहाची ओळख पटली नसून ज्यांना या मृतदेहाबद्दल माहिती असेल त्यांनी नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक टी. बी. खेडकर यांच्याशी त्वरित संपर्क साधावा असे आवाहन नेवासा पोलिसांनी केले आहे ( मोबाईल नंबर 95 94 95 49 17.)