अकोल्यात आरपीआय(ए) चे कार्यकर्ते शिवसेनेच्या वाटेवर!

तालुका अध्यक्ष विजय पवार यांचा पदाचा राजीनामा ?
अकोले प्रतिनिधी
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए )चे अकोले तालुका अध्यक्ष विजय रमेश पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे
अकोले तालुक्यातील आरपीआय( ए)चे अनेक कार्यकर्ते शिंदे गटाच्या शिवसेनेच्या गळाला लागले असून त्यासाठीच श्री विजय पवार यांनी राजीनामा दिला असल्याचे बोलले जाते अकोले तालुक्यातील आरपीआयचे कार्यकर्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत समशेरपूर गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य व शिवसेनेचे उत्तर नगर जिल्हा संपर्क प्रमुख बाजीराव दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरपीआय( ए) गटातील कार्यकर्ते लवकरच शिंदे सेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती हाती आली आहे खासदार सदाशिव लोखंडे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संगमनेर येथे लवकरच होणाऱ्या कार्यक्रमात हे कार्यकर्ते शिंदे सेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते
आरपीआय आंबेडकर गटाचे अकोले तालुका अध्यक्ष विजय पवार यांनी आपल्या तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा नुकताच आरपीआय चे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत दारोळे,अहमदनगर जिल्हा अध्यक्ष भाऊसाहेब पगारे , राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे
श्री पवार यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे की मी अनेक वर्ष आरपीआयचे सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम केले परंतु या पुढील काळात व्यक्तीशः मला पक्षासाठी पुरेसा वेळ देता येत नसल्याने मी आपल्या पदाचा राजीनामा देत आहे श्री विजय पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षाकडे पाठवला असून अकोले तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा स्वीकारून मला जबाबदारी तुन मुक्त करावे असे म्हटले आहे
श्री पवार हे लवकरच शिंदे गटात सामील होणार असल्याचे समजते शिंदे सेनेचे अहमदनगर जिल्हा संपर्क प्रमुख बाजीराव दराडे यांनी श्री पवार यांना शिंदे सेनेत येण्याचा आग्रह धरल्याने लवकरच ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे समजते
आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंबेडकर गटातील आरपीआयच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेच्या शिंदे गटात होणारा प्रवेश हा महत्त्वाचा ठरणार आहे शिंदे सेनेची ताकद अकोले तालुक्यात आणखी वाढेल असा अशी चर्चा आता सुरू झाली आहे
श्री विजय रमेश पवार हे आरपीआय आंबेडकर गटाचे तालुकाध्यक्ष असून ते कोदणी येथील रहिवासी आहे आदिवासी भागात कार्यकर्त्यांचे त्यांचे चांगले नेटवर्क च असल्याने त्यांचा शिंदे गटात प्रवेश होणार असल्याचे चर्चा आहे