सत्यनिकेतन संस्थेचे सचिव टी.एन.कानवडे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान.

अकोले/प्रतिनिधी-
सत्यनिकेतन संस्थेचे सचिव , माजी प्राचार्य टी.एन. कानवडे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जीवनसाधना गौरव पुरस्कार अध्यात्मिक गुरू आणि आर्ट ऑफ लिव्हिंग चे संस्थापक श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.विद्यापीठाचे अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना या वेळी अमृत गौरव विशेष सन्मान पुरस्कार देउन गौरवण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी होते.
विद्यापीठाच्या वतीने विद्यापीठ वर्धापन दिनाच्या निमित्ताने वेगवेगळ्या क्षेत्रातील सुप्रतिष्ठीत व्यक्तींनी केलेल्या योगदानाचा गौरव व्हावा या उद्देशाने दरवर्षी त्यांना जीवनसाधना गौरव पुरस्काराने विद्यापीठामार्फत सन्मानित केले जाते.प्राचार्य कानवडे याना त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल या वर्षीचा पुरस्कार देण्यात आला आहे.
आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अमृतमहोत्सवी वर्षातिल वर्धापन दिनाचा सोहळा विद्यापीठाचे पै.खाशबा जाधव क्रीडासंकुलातील इनडोअर हॉल मध्ये विविध मान्यवर तसेच शिक्षण प्रेमींच्या उपस्तीतीत उत्साही वातावरणात संपन्न झाला.
कायदा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी
पदमश्री ऍड.उज्वल निकम,उद्योजकता व व्यावसायिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी मिलिंद कांबळे,शैक्षणिक व कृषी क्षेत्रातील योगदानासाठी अनिल मेहेर,शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी सतिषराव काकडे देशमुख,शैक्षणिक सामाजिक व सहकार क्षेत्रातील योगदानासाठी कृष्णकुमार गोयल या मान्यवरांना या वेळी जीवन साधना गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले.राजकीय व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल उत्तरप्रदेश चे पड्मभूषण माजी राज्यपाल राम नाईक यांनाही जीवनसाधना गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. मात्र प्रकृती ठीक नसल्यामुळे ते उपस्थित नव्हते.
प्राचार्य कानवडे यांनी तेवीस वर्षे आदिवासी भागातील राजूर येथील अॅड. मनोहरराव देशमुख महाविद्यालयात प्राचार्य म्हणून काम पाहिले. प्राचार्य पदाचे काळात विद्यार्थ्यांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविले.त्यांचे प्राचार्य पदाचे कार्यकाळात महाविद्यालयाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.सध्या ते सत्यनिकेतन संस्थेचे सचिव म्हणून काम करीत आहेत.अलीकडेच त्यांना राज्य शासनाचा आदिवासी सेवक पुरस्कार मिळाला आहे.
या वेळी अकोले तालुक्यातील शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सत्यनिकेतन संस्थेचे संचालक मिलिंद उमराणी, प्रकाश टाकळकर, प्रकाश शहा, व्यवस्थापक प्रकाश महाले, राजूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी. वाय. देशमुख,प्राचार्य भाऊसाहेब बनकर, प्राचार्य मधुकर मोखरे, प्राचार्य बादशाह ताजणे,माजी प्राचार्य एल. पी परबत, एम. डी. लेंडे,प्रा. धनंजय पगारे, जालिंदर आरोटे, सचिन पवार, किशोर देशमुख, संजय व्यवहारे, सदाशिव गिरी, बापूसाहेब गहिरे, सुनील पाबळकर, माजी प्राचार्य अंतूराम सावंत,संपत धुमाळ, सौरभ महाले,संतराम बारवकर, अमोल तळेकर, संतोष वाकचौरे, भास्कर सदगीर, विक्रम आंबरे, सचिन लगड, डॉ. डी. के गंधारे,डॉ.वाल्मीक गिते, शाम शेळकंदे, डॉ. भरत शेणकर,आय टी आय चे माजी प्राचार्य विद्याचंद्र सातपुते, उद्योजक भारत पिंगळे, शांताराम वैद्य,विलास तुपे आदिसह अनेक प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.