अबीतखिंड येथे भैरवनाथ सेवा मंडळाचा हीरक महोत्सव साजरा शंभर शेतकऱ्यांना मोफत विमा पॉलिसीचे वितरण

अकोले प्रतिनिधी
श्री भैरवनाथ सेवा मंडळ मुंबई – अबिटखिंड या मंडळाचा हीरक महोत्सवी मेळावा नुकताच अबीतखिंड ता अकोले येथे पार पडला यावेळी गावातील 100 शेतकऱ्यांना मोफत अपघात विमा पॉलिसीचे वितरण करण्यात आले
सर्वोदय विद्या मंदिर अबितखिंड येथे आयोजित करण्यात असलेल्या या मेळाव्यास ग्रामस्थ गावातील नोकरदार व्यावसायिक मोठया संख्येने उपस्थित होते
नोकरी व्यवसायाचे निमित्ताने मुंबईत स्थायीक झालेल्या ग्रामस्थांनी पहिले हे मंडळ मुंबई पुरतेच मर्यादित होते परंतु मुंबईकरांनी आता गावासाठी सर्व नोकरदारांना, व्यावसायिकांना एकत्र घेऊन समाजप्रबोधन समाज विकासाचे स्वप्न उराशी बाळगून नव्याने मंडळाचा विस्तार केल्याचे अध्यक्ष रामनाथ भोजने यांनी सांगितले

या प्रसंगी मंडळातील जेष्ठ सदस्य
श्री सुधाकर भिकाजी गोडे, ह.भ.प. यशवंत बुवा घनकुटे, श्री सावळेराम बुवा घनकुटे, बाळासाहेब भिकाजी गोडे (गुरुजी), श्री शंकर शिवराम गोडे, श्री मधुकर गोविंद जगधने, श्री अशोक गोविंद जगधने, श्री वसंत सखाराम घनकुटे, देवराम लक्ष्मण भवारी, श्री सिताराम किसन गोडे, श्री लक्ष्मण नामदेव भोजने, श्री दुलाजी तुकाराम भोजने, श्री नामदेव रामजी भोजने, श्री अनंता भागाजी तिटकरे, श्री मारुती यशवंत भवारी, श्री रामनाथ पांडुरंग भवारी, श्री धोंडिबा रामभाऊ भोजने यांचा गुलाब पुष्प, श्रीफळ , सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच गावातील शेतकऱ्यांनाओरिएंटल इन्शुरन्स कंपनी तर्फे
मोफत अपघात विमा पॉलिसीचे वितरण करण्यात आले
भैरवनाथ सेवा मंडळाचा स्नेह मेळावा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष्य श्री रामनाथ भोजने, उपाध्यक्ष श्री भानुदास घनकुटे, सचिव श्री सुनिल शिंदे, उपसचिव श्री भाऊसाहेब जगधने, खजिनदार श्री लालजी भोजने आणि श्री सुधाकर गोडे, मंडळाचे हिसोब तपासणीस श्री सुरेश भवारी आणि चंद्रकांत घनकुटे, सदस्य श्री जालिंदर घनकुटे आणि श्री संजय शिंदे यांनी परिश्रम घेतले
