इतर

अकोल्यातील जेष्ठ नेते मीनानाथ पांडे यांचे निधन

अकोले प्रतिनिधी


अकोले तालुक्यातील ज्येष्ठ नेते,अगस्ति कारखान्याचे संचालक,व संगमनेर कारखान्याचे माजी संचालक मिनानाथ सखाराम पांडे (वय-६८,वर्षे) यांचे रविवारी रात्री ११:३०च्या सुमारास नाशिक येथे उपचारा दरम्यान ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.

त्यांचा अंत्यविधी आज सोमवारी सकाळी ९:०० वाजता कुंभेफळ ता.अकोले येथे होणार आहे.अकोले तालुक्यातील अनेक राजकीय सामाजिक चळवळीत त्यांचा सिंहाचा वाटा होता अकोले तालुका एज्युकेशन संस्थेचे सेक्रेटरी , अकोले तालुका ओबीसी संघटनेचे नेते अगस्ती व संगमनेर साखर कारखान्याचे संचालक अशा अनेक पदांवर त्यांनी उल्लेखनीय काम केले अकोल्यातील पाटपाणी चळवळ , अनेक सामाजिक प्रश्नासाठी झालेल्या आंदोलनात ते नेहमी पुढे असत त्यांच्या जाण्याने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button